जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड न्युज इफेक्ट
नगर जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गावर आसलेल्या जामखेड ते चिंचपूर या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. परीणामी वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा महामार्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात अशा आशयाची बातमी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत प्रशासनाने ताबडतोब रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. नागरिकांनी जामखेड न्युजचे आभार
मानले आहेत.
जामखेड ते बीड जिल्ह्य़ातील चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याच बरोबर जामखेड शहरातून जाणाऱ्या या जामखेड बस स्थानक ते खर्डा चौक या ठिकाणी देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडेही सबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अशा आशयाची बातमी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी ताबडतोब दखल घेत खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे रस्ता दुरूस्तीला सुरूवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे व जामखेड न्युजचे आभार मानले आहेत.
जामखेड तै सौताडा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामास मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्याप या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे देखील शहरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॉफीक जाम होते त्यामुळे तातडीने हे काम देखील सुरू करण्याची मागणी जामखेड करांकडुन होत आहे. मंजूर झालेल्या जामखेड ते सौताडा या १८० कोटींच्या या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर वहातुक अडथळा दुर होऊन ट्रॉफीक पोलीसांचे देखील काम हालके होण्यास मदत मिळणार आहे. तसेच जामखेड शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे.
जामखेड ते सौताडा महामार्ग मंजूर आहे आमदार रोहित पवार व खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी सांगितले की आमच्या प्रयत्नातून हा महामार्ग मंजूर आहे. दोघांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते व पत्रकार परिषदेत आम्हीच रस्ता मंजूर केला असे सांगितले होते. हा रस्ता मंजूर आहे. पण रस्ता सुरू होण्यास चार ते पाच महिने लागतील तोपर्यंत वाहने चालविण्याच्या लायकीचा रस्ता राहणार नाही. त्यामुळे जामखेड न्युजने चिंचपूर ते जामखेड रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे नागरिकांनी फोन करून व सोशल मीडियावर जामखेड न्युजचे आभार मानले आहेत. एक निर्भीड व जनतेच्या हक्कांसाठी नेहमीच अग्रेसर असणारे जामखेड न्युज आहे अशी नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.









