जिल्‍हा परिषद शिक्षकाचा मुलगा झाला साहेब

0
274
जामखेड न्युज – – – – 
अभियांत्रिकी आणि वैद्यकिय प्रवेशपुर्व परीक्षेतच नव्हे तर स्पर्धा परीक्षेत लातूरचा दबदबा निर्माण होत असून, गतवर्षी सहा विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली होती. प्राप्त निकालानुसार यंदा दोघांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. किल्लारीच्या शुभम संजय भोसले याने देशात १४९ वी रँक मिळवून यशाची पताका फडकाविली आहे.

                         ADVERTISEMENT

पदवी परीक्षेचे शिक्षण घेतानाच शुभमने तयारी केली अन् दुस-या प्रयत्नात तो यशस्वी झाला आहे. मुळचा किल्लारीचा असलेल्या शुभमचे प्राथमिक शिक्षण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयात झाले. तर आठवी ते दहावी प्रकाशनगर येथील सरस्वती विद्यालयात झाले असून, अकरावी व            बारावीचे शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालयात पुर्ण केले. दहावी ९८ टक्के तर बारावीत ८९ टक्के घेतलेल्या शुभमने मुंबईच्या एस.पी. कॉलेजमधून बी.टेकचे शिक्षण पुर्ण केले.
बी.टेकला असतानाच स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याचा निश्चय शुभमचा होता. जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले त्याचे वडील संजय भोसले यांनीही शुभमला प्रोत्साहन दिले. दिल्ली येथे युपीएससीच्या तयारीला पाठविले. तिथे एक ते दीड वर्षे तयारी केल्यानंतर मागील वर्षी शुभमने परीक्षा दिली होती. मात्र, चार गुणांनी संधी हूकली.
दरम्यान, खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी सुरु केली. औसा येथेच तो तयारी करीत होता. दृढ निश्चय, प्रचंड मेहनत करुन शुभमने यशाला गवसणी घातली अन् १४९ वा रँक मिळविला. आपल्या स्वप्नांना समस्या सांगू नका तर आपल्या समस्यांना आपली स्वप्ने सांगा हा विचार शुभमने या यशातून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here