जामखेड न्युज – – –
जिद्द आणि महत्त्वकांक्षा असेल, मेहनत (Hardwork) घ्यायची तयारी असेल तर एक शिपाईसुद्धा (Peon) आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकतो. याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. या शिपायाने जे केलं, त्यांचा प्रेरणादायी प्रवास सर्वांना अचंबित करत आहे.
ADVERTISEMENT
ते एक वाक्य खटकले आणि…
संभाजी वाघमारे असे या प्रेरणादायी व्यक्तीचे नाव आहे. संभाजी यांचा शिपाई ते उपकुलसचिपदाचा (Peon to Deputy Registrar) प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. शिपाई असून, तू एका लिपिक महिलेशी कसे काय लग्न केलेस? एवढेच एक वाक्य या शिपायाला (Peon) जिव्हारी लागले. यानंतर त्यांनी वेगळाच ध्यास घेत आपली परिस्थिती बदलवण्याचा निर्णय घेतला.
संभाजी वाघमारे हे वयाच्या 19व्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) शिपाई म्हणून रुजू झाले होते. त्यांनी बाणेर ते पुणे असे तीन वर्ष प्रवास करुन नोकरी केली. याच कालावधीत त्यांनी एका विधवा महिलेशी लग्न केले. यावेळी त्यांना त्यांच्या कार्यालयातील एका महिलेने विचारले की, तू शिपाई आहेस. मात्र, तू लिपिक महिलेशी लग्न कसे केले. यानंतर हे वाक्य संभाजी यांच्या जिव्हारी लागले.
इथूनच त्यांचा प्रेरणादायी प्रवास सुरु झाला. त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. पदोन्नतीने ते लिपिक, वरिष्ठ लिपिक, कक्षाधिकारी, सहायक कुलसचिव आणि निवृत्तीपर्यंत उपकुलसचिव पदाचा टप्पा यशस्वीपणे गाठला.
31 मेला होणार सेवानिवृत्त –
संभाजी वाघमारे यांनी तब्बल 9 वर्ष शिपायाची नोकरी केली. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या त्या प्रसंगाने त्यांचे पूर्ण आयुष्य बदलले. आपल्या सेवेच्या काळात त्यांनी विद्यापीठातील विविध विभागात काम केले. ते गेल्या काही वर्षांपासून परीक्षा विभागात सहायक उपकुलसचिव या पदावर कार्यरत आहेत.
विद्यापीठातील वसतिगृहाचा उपकुलसचिव पदाचाही कार्यभार ते सांभाळत आहेत. शिपाई ते उपकुलसचिव असा प्रवास केलेले वाघमारे हे उद्या 31 मे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची ही कारकिर्दीने आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.