जामखेड महावितरण म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा, सतत लाईट गायब होत असल्याने नागरिक हैराण

0
216

जामखेड न्युज – – – –

    जामखेड शहरातील महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असून भर उन्हाळ्यात सतत लाईट गायब होत असल्याने घामाच्या धाराने नागरिक हैराण होत आहेत. शहरातील अनेक भागातील ट्रान्सफॉर्मर वर अतिरिक्त दाब असल्याने सतत फ्युज जाते त्यामुळे वैतागलेल्या काही नागरिकांनी सोशल मीडियावर एक मेसेज टाकला आहे की सलग दहा तास लाईट दाखवा व महावितरणने बक्षिस मिळवावे असे आवाहन केले आहे. महावितरण कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.
      सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. यातच सतत लाईट जाते फ्युज उडणे हे प्रकार दिवसा घडतात तसे रात्रीही सतत लाईट जाते कधी कधी तर दोन ते चार तास लाईट नसते यामुळे नागरिक उकाड्याने हैराण होतात. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ते म्हणतात डिपीवर अतिरिक्त भार आहे. त्यामुळे लाईट जाते. नविन डिपीला मंजुरी मिळत नाही. त्यामुळे संताजीनगर भागातील नागरिक आमदार रोहित पवारांना याबाबत निवेदन देणार आहेत. असे नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
      सलग दहा तास लाईट दाखवा व महावितरणने बक्षिस मिळवा असा मजेशीर मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. दिवसाही लाईट जाते त्यावेळी लोक बाहेर बसतात पण रात्री झोपेतच अनेकदा लाईट गायब होते त्यामुळे लोकांची झोप होत नाही. घामाने नागरिक हैराण होतात.
  जामखेड शहरासाठी आठ दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळते पाणी आल्यावर अनेकदा लाईट जाते त्यामुळे नागरिकांना पाणी भरता येत नाही नळाला मोटार लावली नाही तर पाणी मिळत नाही.
  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब लाईट सुरळीत होईल असे पाहवे. जास्त लोड असणाऱ्या डिपीवर दुसरी डिपी बसवावी कारण नागरिकांना अव्वाच्या सव्वा बीले भरावी लागतात पण लाईटची सेवा मिळत नाही यामुळे नागरिक वैतागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here