एसटी बस व ट्रॅक्टरची धडक एक जखमी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी धावले मदतीला

0
209
जामखेड प्रतिनिधी
               जामखेड न्युज – – – – 
 जामखेड बीड रोड वरील हापटेवाडी  शिवारा मध्ये रोड खराब असल्यामुळे एस टी बस क्र एम एच 06 एस 8461 आणि ट्रॅक्टर ची धडक होऊन सचिन बबन शिंदे वय 35 हा जखमी झाला असून पाय फॅक्चर झाला आहे.
घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले एस टी आणि ट्रॅक्टर ची धडकझाल्यामुळे ट्रॅक्टर वरील  ड्रायव्हर सचिन बबन शिंदे वय 35 मुक्काम पोस्ट सौताडा तालुका पाटोदा जिल्हा बीड हा जबर जखमी झाला असून त्यास ताबडतोब दवाखान्यात दाखल केले आहे त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.
एसटी मधील प्रवाश्यांना काही झाले नाही
अपघात झाल्यामुळे बराच वेळ ट्राफिक जाम झाली होती घटनास्थळी जामखेड पोलिस ताबडतोब हजर झाले
 एसटी क्रमांक एम एच 06- 84 61 ही पाटोदा- नाशिक गाडी असून ती नाशिक कडे चालली होती कोठारी यांनी ताबडतोब पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहिती दिली असून एस टी डेपो मॅनेजर महादेव शिरसाट यांना माहिती दिली आहे अपघातस्थळी विजय धोत्रे यांनी  कोठारी यांना फोन केला यावेळी प्रशांत धोत्रे आदींनी मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here