जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड येथिल नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीना राळेभात यांना नुकतेच दै लोकमत तर्फे दिला जाणारा एक्सलंट टीचर्स अवार्ड ने गौरव करण्यात आला. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी ज्ञान दानाचे कार्य अखंडपणे ठेवले त्यामुळे त्यांच्या सह जिल्ह्य़ातील ४७ शिक्षकांचा गौरव यावेळी करण्यात आला.
ADVERTISEMENT 

अहमदनगर येथे शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. या वेळी या शिक्षकांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या कॉफीटेबल बुकचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मीना राळेभात मॅडम यांना जलसंधारण मंत्री श्री. शंकरराव गडाख, राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडु, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस, रेणुका माता मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भालेराव,संपादक सुधीर लंके, सर व्यवस्थापक नरेंद्र अंकुश सह अनेक मान्यवर उपस्थित होते.





