जामखेड महाविद्यालयात करिअर विषयक व्याख्यान संपन्न इतिहास विषयातील करिअरच्या संधी विषयी माहिती

0
533
जामखेड न्युज – – – – 
 जामखेड महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना इतिहास विषयातील विविध करिअर विषयी माहिती व्हावी, या उद्देशाने प्र.प्राचार्य. डॉ.सुनिल नरके यांच्या मार्गदर्शनानुसार “इतिहास विषयातील करिअरच्या संधी” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन केले होते.
                          ADVERTISEMENT
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा. डॉ.सुनिल नरके हे होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख डॉ. कांबळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिथी व्याख्याते म्हणून महात्मा फुले नूतन महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख मा. प्रा. श्री. जाधव टी.एच. हे उपस्थित होते. डॉ.नरके  यांच्या हस्ते व्याख्यात्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. जाधव सरांनी विद्यार्थ्यांना व्याख्यानातून इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील संधी, अध्यापन, संशोधन, इतिहासकार, इतिहास तज्ञ या बरोबरच पुरातत्वशास्त्र, अभिलेखागर व वस्तुसंग्रहालय शास्त्रातील नवीन संधी बाबत माहिती दिली . त्याच बरोबर पर्यटन, टुरिस्ट गाईड, कृषी पर्यटन इ. नवीन आव्हानात्मक क्षेत्रांची ओळख करून दिली.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. गायकवाड आश्विनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख श्री. पेटकर योगेश यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इतिहास विभागाने केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here