कायदा मोडणारांची गय केली जाणार नाही – आण्णासाहेब जाधव

0
243
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
तालुक्यातील व शहरातील व्यापाऱ्यांना कायदा सुव्यवस्थेबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, मात्र कायदा मोडणारांची गय केली जाणार नाही. जामखेड तालुका व शहरात होणाऱ्या चोऱ्या, ट्रॅफिकची समस्या तसेच पोलीस स्टेशन व नगरपरिषद संदर्भात व्यवसाईकांना येणाऱ्या अडचणी या बाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व मुख्याधिकारी  मिनीनाथ दंडवते यांच्याशी चर्चा करून व्यापाऱ्यांसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच आवश्यकते नुसार P-1, P-2 पार्किंगची व्यवस्था करणे, ट्राॅफिक नियमांबद्दल शहरातील चौका-चौकात बोर्ड लावणे अशा अनेक सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे प्रतिपादन कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले.
     आज दि. १८ मे रोजी जामखेड पोलिस स्टेशन च्या वतीने जामखेड व खर्डा येथील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, सुवर्ण व्यवसाईक व माजी नगरसेवक अमित चिंतामणी, मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप, उद्योजक समीर चंदन, अमोल चिंतामणी, प्रफुल्ल सोळंकी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, अमोल तातेड, अनुराग गुगळे, तेजस बोरा, मंगेश बेदमुथा, संजय मुळे, अभय शिंगवी, अजय कोठारी, पिंटू बोरा, दादा कलासागार, अशोक बाफना, ऋतुराज फुटाणे, सार्थक कोठारी आदि व्यापारी उपस्थित होते..
       जामखेड व खर्डा या दोन्ही ठिकाणच्या मिटींग मधे खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
१) चार चाकी वाहन पार्किंग करीता शहरात जागा उपलब्ध नाही. ती जागा उपलब्ध करून पे पार्किंग सुरू करण्याबाबत नगरपरिषद यांना पत्रव्यवहार करून ती लवकरच सुरू करण्याबाबत आग्रही राहू. २)  CCTV कॅमेरे हे आपल्या दुकानासमोर रोड दिसेल  असे तसेच चांगल्या दर्जाचे लावावेत. जेणेकरून त्या कॅमेरामध्ये सर्व बाबी दिसून येतील.३) व्यापारी यांचे सुरक्षितेबाबत त्यांना मार्गदर्शन केले. ४) गिऱ्हाईकांना गाड्या लावताना आपल्या दुकानासमर गाड्या पोलिसांना मदत होईल याप्रमाणे यांना पार्क करण्यास सांगावे.५) मालवाहतूक गाड्या शक्यतो सकाळीच बोलवाव्यात म्हणजे ट्राॅफिकला अडचण होणार नाही.
    यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड
यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.
      तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप, अमित चिंतामणी यांनी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी पोलीस प्रशासनासमोर मांडल्या व व्यापारींच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here