Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या —होय माझा अधिकार्‍यांवर दबाव आहे – आमदार रोहित पवार

—होय माझा अधिकार्‍यांवर दबाव आहे – आमदार रोहित पवार

0
338
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – –
सामान्य लोकांसाठी गरीबांना मदत करण्यासाठी माझा अधिकार्‍यांवर आदरयुक्त दबाव आहे. त्यामुळेच कर्जत-जामखेडमध्ये विकासाची गंगा येत आहे. कर्जत-जामखेड बदलत आहे. रस्ते, वीज, पाणी, पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर होत आहेत तसेच घरकुल योजना याबरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात आहेत. यामुळे घरकुल योजनेत जामखेड तालुका नाशिक विभागात दुसर्‍या क्रमांकावर आहे. गरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा हट्ट असतो असे प्रतिपादन आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले 
                         ADVERTISEMENT

जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणार्‍या निवासस्थानाचा भूमीपूजन सोहळा सोमवार दि . १६ रोजी आमदार रोहित पवारांच्या हस्ते संपन्न झाला
तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, महिला व बालकल्याण अधिकारी ज्योती बेल्हेकर, आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी बी. के. माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सभापती सुर्यकांत मोरे, माजी सभापती संजय वराट, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, विकास राळेभात, अॅड हर्षल डोके, राजेंद्र पवार, युवराज पाटील जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना, प्रशांत सातपुते, बबन बहिर, राजेंद्र वळेकर, ठेकेदार अमित महाजन, सिद्धेश्वर भजनावळे, राहुल उगले, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, इस्माईल सय्यद, संध्याताई सोनवणे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील सर्वानी सहकार्य केले त्यामुळे एवढा निधी आणता आला. खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर जाण्यासाठी जामखेड मध्ये ४५० पाणंद रस्ते पुर्ण केले आहेत आणि तसेच यावर्षी १२०० रस्ते घेतलेले आहेत. १४ कोटी रुपयांचा निधी आणला यामुळे दोन ते अडीच लाख लोकांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच कोरोना काळात आई किंवा वडिल गमावलेल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी कर्जत-जामखेड मधील १७०० मुलांना मदत होणार आहे. मागील काळात आपण घरकुल योजनेच्या कामात विभागात खालून दुसरा क्रमांक होता आता वरून दुसरा क्रमांक आहे.. हे सर्व अधिकार्‍यांना विश्वासात घेऊन कामे होत आहेत. 
  तसेच पंचायत समितीच्या ३२ निवासस्थानासाठी १० कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले आहेत याचे भूमिपूजन झाले आता लवकरच महसूल विभागासाठी १२ कोटी रुपयांचे निवासस्थाने व आरोग्य कर्मचार्‍यांसाठीही लवकरच जांबवाडी येथे १२८ गुंठे जागेवर निवासस्थाने होतील जेणेकरून अधिकारी कर्मचारी इथे राहून जनतेचे प्रश्न मार्गी लागतील.  ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती सर्वानी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरी करावयाची आहे त्यासाठी सकाळी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे किर्तन व नंतर उपमुख्यमंत्री येणार आहेत तसेच २ जून रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत कर्जत मध्ये होणार असल्याचे सांगितले. 
रोहित थोरात खेलो इंडिया मध्ये निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. 
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ  यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, आमदार रोहित पवारांचा विकास कामांचा वेग अधिक आहे त्यामुळे अधिकार्‍यांनाही अंग झाडून काम करावे लागते.यामुळेच सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लागतात  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातच राहावे म्हणून भव्य दिव्य असे निवासस्थान महाराष्ट्रातील एकमेव निवासस्थान आहे. 
   यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, अधिकारी व पदाधिकारी यांना आमदार साहेबांमुळे चांगली ऊर्जा मिळते आमदारांनी अडचणी हेरल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
   यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सुर्यकांत मोरे, दत्तात्रय वारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. 
  मतदारसंघातील शिल्लक ऊसाविषयी जामखेड न्युजशी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, नोंदविलेल्या ऊसाचे एक टिपरूही शिल्लक राहणार नाही तसेच अडचणीतील काही एकर ऊस शिल्लक असेल तर त्या शेतकऱ्यांना मदत मिळेल याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याविषयी जनताच त्यांना उत्तर देईल असे सांगितले येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का असे विचारले असता ते म्हणाले निवडणुकीच्या वेळेसच याचे उत्तर मिळेल 
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!