ड्रायविंग लायसन्ससाठी आरटीओसमोर तासंतास उभे राहण्यापासून सुटका आता ड्रायविंग ट्रेनिंग स्कूलमध्येच मिळणार सर्टिफिकेट

0
229
जामखेड न्युज – – – – 
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवणं हे थोडं कठीण काम आहे. त्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रोसेसमधून जावं लागतं. ज्यात लेखी परीक्षेपासून ते ड्रायविंग टेस्टपर्यंत अनेक प्रक्रियांचा समावेश होतो.शिवाय, टेस्टसाठी आरटीओमध्ये तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागते.आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला टेस्टसाठी रांगेत उभे राहावं लागणार नाही. त्याऐवजी, तुम्ही कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त ड्रायविंग सेंटरवर (Driving Center) जाऊन टेस्ट देऊ शकता.
                         ADVERTISEMENT
         
सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांचा फायदा नागरिकांना होणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओमध्ये (RTO) जाण्याची गरज भासणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारने बनवलेले नवीन नियम पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहेत. यामुळे आगामी काळात ड्रायविंग लायसन्स बनवणार असलेल्या लोकांना, प्रामुख्याने नुकतंच १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या तरुणांना सरकारच्या या नवीन नियमाने दिलासा दिला आहे.
ड्रायविंग लायसन्स बनवायचं म्हटलं की ड्रायविंग टेस्ट आलीच, मात्र ड्रायविंग लायसन्स बनवण्याच्या नवीन नियमांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायविंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय १ जुलै २०२२ पासून नवीन नियम लागू करणार आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना काढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कशी असेल ड्रायविंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया?
ड्रायविंग लायसन्स बनवण्यासाठी, तुम्हाला आरटीओमध्ये तुमचा नंबर कधी येईल, तुमची टेस्ट कधी होईल याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायविंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायविंग लायसन्ससाठी नोंदणी अर्ज करू शकता. त्यानंतर तेथून प्रशिक्षण घेतल्यानंतर, तिथेच टेस्ट देऊ शकता. ड्रायविंग स्कूलकडून टेस्ट पास झालेल्या नागरिकांना एक सर्टिफिकेट दिलं जाईल. त्या प्रमाणपत्राद्वारे नागरिकांचं ड्रायविंग लायसन्स बनवलं जाईल.
ड्रायविंग लायसन्ससाठी परिवहन मंत्रालयाने एक कोर्स तयार केला आहे. हा कोर्स थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये विभागलेला आहे. लाइट मोटर व्हेईकल (LMV) साठी कोर्सचा कालावधी ४ आठवडे आहे जो २९ तासांचा असेल. तर प्रात्यक्षिकासाठी रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींसाठी २१ तासांचा अवधी दिला जाईल. त्याच वेळी, तुम्हाला उर्वरित ८ तास थिअरीची माहिती दिली जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला ड्रायविंग स्कूलकडून सर्टिफिकेट दिलं जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here