छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महारांजी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा एकही सम्राट हिंदुस्थानात नव्हता – पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड
जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड येथिल खर्डा चौकात मंगेश (दादा) आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शंभुराजे कुस्ती संकुल व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती आयोजित केली होती यावेळी मंगेश (दादा) आजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, प्रा. सचिन गायवळ सर, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, राजेंद्र गोरे, माजी कृषी अधिकारी सुंदरददास बिरंगळ, जाकीर शेख, राहुल पवार सह अनेक शेतकरी व युवा कार्यकर्ते हजर होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. शिवरायांप्रमाणे शंभू राजेंनी देखील दैदिप्यमान, रणभूमीवर पराक्रम गाजवला होता. संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवाचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. पण गेली तीनशे वर्षे महाराजांची बदनामी झाली तसेच जयंतीही साजरी होत नव्हती हे आपले दुर्दैव आहे. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. ते प्रख्यात पंडित होते.
यावेळी बोलताना आयोजक मंगेश आजबे म्हणाले की, आज जामखेड शहरात सर्व जातीधर्माच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती पेढे वाटून साजरी करण्यात आली.









