जामखेड न्युज – – – –
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याने पत्रकारांमध्ये झालेल्या संतापाच्या विरोधात आमदार रोहित पवार यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रित करून आपल्या कार्यालयात पत्रकारांसमवेत बैठक घेऊन झालेल्या सर्व गोष्टींचा खुलासा करून पत्रकारांच्या भावना समजावून घेतल्या पुढे असा प्रकार घडणार नाही. पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळणार याची दखल घेतली जाईल त्यामुळे पत्रकारांनी मोठ्या मनाने असे विषय दुर्लक्षित करून समाजपरिवर्तनासाठी एकत्र यावे असे आमदार रोहित पवारांनी पत्रकारांच्या बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी आमदार रोहित पवारांशी चर्चा करताना जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, नंदुसिंग परदेशी, सुदाम वराट, अविनाश बोधले, मोहिद्दीन तांबोळी, यासीन शेख, संतोष गर्जे, अशोक वीर, समीर शेख, धनराज पवार, पप्पू सय्यद, अजय अवसरे, किरण रेडे, संतोष थोरात, अनिल धोत्रे, वसंत सानप, दिपक देवमाने, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे, लियाकत शेख यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
नुकताच जामखेड पत्रकार संघास राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड पत्रकार संघाचे अभिनंदन केले.
पत्रकारांच्या माध्यमातूनच खरे परिवर्तन होत असते सर्व पत्रकारांनी एकत्र यावे म्हणजे परिवर्तन करू, जामखेडचे नाव महाराष्ट्रात उंचावण्यासाठी सर्वानी जोमाने प्रयत्न करून लोकचळवळ बनवू व निश्चितच परिवर्तन करू
तसेच पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार रोहित पवारांनी दिले
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण यांनी सर्व पत्रकार सदस्याच्या सहमतीने दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेला रोष मागे घेत मागे घेतला. यापुढे पत्रकारांच्या संदर्भात गैरवर्तन सहन केले जाणार नाही असे नासीर पठाण यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार व पत्रकार यांची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.