जामखेड न्युज – – –
आमदार रोहित पवार आपल्या जामखेड शहरातील भगिनींच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणी घेऊन आलेत. दिवसभराच्या कामातून महिलांना विसावा मिळावा, त्यांच्या कला, आवडीनिवडी जोपासता याव्या हे जाणून रोहित पवारांनी जामखेड तालुक्यात एकूण ७ ठिकाणी खेळ पैठणीचे आयोजन केले होते. यातील शेवटचा कार्यक्रम १३ मे रोजी, ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड शहरात संध्याकाळी ४ वाजता होईल.
यात, विविध खेळ व कला सादर करण्याची व याच बरोबर, पैठणी, सोन्याची नथ व इतर ही अनेक बक्षीस जिंकण्याची संधी या माध्यमातून महिलांना मिळणार आहे. तसेच, उपस्थित सर्वच भगिनींना रोहित पवारांच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. सुनंदा पवार यांनी पंचक्रोशीतील सर्व महिलांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील विविध गावात मोठ्या उत्साहात खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला आता जामखेड शहरात उद्या कार्यक्रम होणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.