जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत केशरी कार्ड लाभधारक यांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये सामाविष्ट करून स्वस्त धान्य देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
सदर मोहिमेचे आयोजन कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री रोहित दादा पवार यांचे मदतीने आणि माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर डॉ श्री राजेंद्र भोसले ,जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती जयश्री माळी आणि कर्जत जामखेडचे उपविभागीय अधिकारी डॉ श्री अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.
सदर मोहिमेमध्ये गावातील ज्या लोकांना सध्या धान्य मिळत आहे परंतु ते मयत आहे, कायस्वरूपी स्थलांतरित आहेत किंवा ज्या लोकांना स्वताहून धान्य लाभ सोडायचा आहे अशा लोकांचा शोध घेऊन त्याऐवजी गावातील गरीब लोक ज्यांच्याकडे कार्ड आहे परंतु त्यांना धान्य मिळत नाही अशा लोकांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेता येणार आहे.
या अनुषंगाने सर्व तलाठी, कोतवाल , स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील आणि सरपंच यांना बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थी निवड करत असताना लाभार्थी यांना खालील आवश्यक कागदपत्र आपले स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडेस जमा करायचे आहे . अर्जदार यांचा अर्ज, हमीपत्र,उत्पन्नाचा अहवाल /दाखला , रेशन कार्ड झेरोक्स, कार्डमधील सर्व लाभधारक यांचे आधार कार्ड हे कागद जमा करून आपले स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे जमा करायचे आहे . अर्ज आणि हमीपत्र याचा नमुना दुकानदार यांच्याकडेस मिळेल. उप्तान्नाची मर्यादा हि ग्रामीण भागामध्ये रुपये ४४००० व त्यापेक्षा कमी आणि शहरी भागामध्ये रुपये ५९००० व त्यापेक्षा कमी ठरवून देण्यात आलेली आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही .
सदर मोहिमेचा कालावधी दिनांक १०/५/ २०२२ ते ५/०६/२०२२ असा असणार आहे. या कालावधीमध्ये प्रकरणे जमा करणे, छाननी करणे ,पात्र लाभार्थी ठरवणे , पात्र लाभार्थी यांची शहानिशा करणे , पात्र लाभार्थी यांच्या गावनिहाय याद्या करणे ,पात्र लाभार्थी यांचे कार्ड online करणे , पात्र लाभार्थी यांचे आदेश तयार करणे, असे टप्पे ठरवून त्याप्रमाणे कामकाज पार पडणार आहे. ज्या गावामध्ये जेवढा इष्टांक तयार होणार आहे त्याप्रमाणात लाभार्थी निवड केली जाणार आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्वाना प्रशानातर्फे आवाहन करण्यात येते कि आपण या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा.









