जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील भाजपाने आमदार रोहित पवारांचे नातेवाईक प्रशासकीय अधिकारी वर्गाचा गैरवापर करतात तो टाळावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता तसेच खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनीही आमदार रोहित पवार हे दहा आमदाराएवढे पीए घेऊन फिरतात मतदारसंघातील अधिकारी दडपणाखाली काम करतात असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस कार्यकर्तेच जास्त होते. पत्रकारांना बसण्यासाठी जागा नव्हती तेव्हा काही पत्रकार नाराज होऊन या पत्रकार परिषदेतून निघून आले. पत्रकार परिषदेचा निषेध व्यक्त केला.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट यांच्या सह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हजर होते. पत्रकार आल्यावर पत्रकारांना बसण्यासाठी जागा हवी होती पण मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेच खुर्चीवर बसलेले होते. पत्रकारांना बसण्यासाठी जागा नव्हती तेव्हा काही पत्रकार आले उभे राहिले पण तेथे बसण्यासाठी जागा नाही म्हटल्यावर निघून गेले व पत्रकार परिषदेचा निषेध व्यक्त केला.
याबाबत पत्रकार हे आमदार रोहित पवारांना घटनाक्रम सांगणार आहेत. पत्रकार परिषद आयोजित केली म्हटल्यावर पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळत नसेल तर अशा पत्रकार परिषदेचा जाहिर निषेध