जामखेड सारख्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त भरत दारकुंडे यांच्या समर्थ हाॅस्पिटल मध्ये गोरगरीब रूग्णांना चांगली सेवा मिळेल – खासदार डॉ सुजय विखे-पाटील

0
229
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – – – 
लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या हॉस्पिटल ची चांगली मदत मिळेल. कोविड च्या संकटकाळात खरंच दिलासा देण्याचे काम डॉ भरत दारकुंडे यांनी केले आहे.
जामखेड सारख्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त डॉ. दारकुंडे यांच्या समर्थ हाॅस्पिटल मध्ये गोरगरीब रूग्णांना चांगली सेवा मिळेल याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळाले असे मत खासदार डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे होते. या वेळी या हॉस्पिटलचे उद्घाटन खा. सुजय विखे-पाटील, डॉ भरत दारकुंडे यांचे वडील पोपट केरू दारकुंडे व मातोश्री सौ विमल पोपट दारकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पांडुरंग शास्त्री देवा, डॉ. अभिजित पाठक, डॉ राहुल धुत, डॉ भगवानराव मुरुमकर, प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, सोमनाथ राळेभात, मनोज कुलकर्णी, डॉ प्रशांत जाधव, डॉ.अमित बडवे , डॉ.सचिन घुले ,डॉ तुषार कोहक, श्रीधर तांबे ,चंद्रशेखर शिरसाट, डॉ अर्जुन शेळके दिपक महाराज गायकवाड, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ भरत दारकुंडे व सोनाली भरत दारकुंडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खा सुजय विखे-पाटील म्हणाले की डॉ दारकुंडे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. आणि या शेतकरी कुटुंबातील डॉक्टर आसल्याने त्यांना माणुसकी ची जाण आहे. त्यामुळे या समर्थ हॉस्पिटल मुळे रुग्णांना चांगली सेवा मिळेल अशी मी खात्री देतो. नगर जिल्ह्य़ातील शेतकर्‍यांची मुले डॉक्टर होऊन सेवा करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. समर्थ हॉस्पिटल मुळे गोरगरीबांना सेवा मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. डॉक्टरांनी रुग्ण सेवे बरोबर समाज उपयोगी कामे देखील केली पाहिजेत. देशाच्या आमृत महोत्सवा निमित्ताने विखे फौंडेशन अँड रिसर्च सेंटर तर्फे ७५ दिवस आरोग्य शिबिर आयोजन करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रा मध्ये विळद घाटासारखे कुठलेच कॉन्सर सेंटर नाही.
जामखेड शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा बाबत बोलताना खासदार डॉ.सुजय वीखे म्हणाले की जामखेड ते सौताडा या १८० कोटींच्या रस्त्याचे चारपदरी काम एका महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील हा मुख्य रस्त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तुमचा खासदार कधीच टक्केवारी मागत नाही त्यामुळे कामाचा दर्जा चांगला रहाणार आहे. आजचा राजकीय कार्यक्रम नसल्याने मी राजकीय भाषाण करणार नाही मात्र जामखेड नगरपरिषद निवडणुक येईल त्या वेळी माझ्या भाषणाचा सुर वेगळा दिसेल असे देखिल डॉ सुजय विखे-पाटील यांनी नाव न घेता विरोधकांना लावला.
या नंतर नगरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ राहुल धुत म्हणाले डॉ भरत दारकुंडे हे रुग्णांची चांगली सेवा करणारे डॉक्टर आहेत. कारण त्यांना मी ते रुग्ण सेवेत आल्या पासुन ओळखतो. रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टर यांच्या मध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले पाहिजेत. कारण रुग्णांचा शत्रु हा खरा त्यांचा आजार आहे डॉक्टर नाही ही गोष्ट नातेवाईकांनी समजून घेतली पाहिजे. त्यामुळे उपचारा दरम्यान नातेवाईक व डॉक्टर यांच्या मध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत. या हॉस्पिटलमध्ये एम डी मेडीसीन डॉ अमोल भगत हे २४ तास सेवा देणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सचिन गाडे, सुनील मोरे, दीपक भोरे ,आकाश घागरे, विशाल ढवळे दत्ता साळुंखे अविनाश कराडे आदींनी मदत केली
 सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here