कांद्याला 8 रूपये भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

0
219
जामखेड न्युज – – – 
राज्यात सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचे पडसाद भाजीपाल्यांवरही पडले आहे. एकीकडे लिंबाला विक्रमी भाव आला आहे तर कांद्याने मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा इथं एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने विष घेऊन जीवन संपवल्याची मनहेलावून टाकणारी घटना देवळा तालुक्यातील खुंटेवाडी इथं घडली आहे. महेंद्र भामरे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे कांद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र भामरे या तरुण शेतकऱ्याने कांद्याचे पिक घेतले होते. मात्र, बाजारात कांदा विक्रीसाठी गेले असता योग्य भाव मिळाला नाही.
महेंद्र भामरे या शेतकऱ्याने आज बाजार समितीत कांदा विकला त्याला प्रति क्विंटल 800 रुपये 8 रुपये किलो इतकाच भाव मिळाला. 30 क्विटल कांद्याचे अवघे 24 हजार रुपये हाती येणार होते. एवढ्या खर्चात  वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहून महेंद्र भामरे हैराण झाले होते. यातून या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. महेंद्र भामरे यांनी घरी आल्यावर विष घेऊन आपली जीवन यात्रा संपली. या घटनेमुळे देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here