Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ६६ वर्षीय माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहल्यावर होणारी पत्नी २८ वर्षानी लहान

६६ वर्षीय माजी क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहल्यावर होणारी पत्नी २८ वर्षानी लहान

0
213
जामखेड न्युज – – – – 
माजी क्रिकेटपटू अरुण लाल दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. वयाच्या ६६ व्या वर्षी ते पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असून ३८ वर्षीय बुलबुल साहा यांच्यासोबत ते संसार थाटणार आहेत. येणाऱ्या दोन मे रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून कोलकात्यामधील हॉटेल पियरलेस इन येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, दिग्गज फिरकीपटूचे निधन
आजतकने याबाबत सविस्तर वृत्त दिलेले आहे. अरुण लाल यांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. याआधी त्यांनी आपली पहिली पत्नी रिनाोसबत कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला आहे. रिना मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. रिना यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आता अरुण लाल त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल यांच्याशी लग्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अरुण लाल आणि बुलबुल मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. लग्नानंतर ही जोडी जंगी रिसेप्शनदेखील देणार आहे.
अरुण लाल यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे १९५५ च्या ऑगस्ट महिन्यात झाला. त्यांनी पश्चिम बंगालसाठी क्रिकेट खेळलेले आहे. या लग्नात क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अधिकारी तसेच अनेक क्रिकेटपटूंना आमंत्रित केले जाणार आहे. अरुण लाल यांना २०१६ साली कर्करोगाने ग्रासले होते. या आजारामुळे त्यांनी समालोचन करणे सोडून दिले होते. मात्र कर्करोगावर मात करुन त्यांनी पुन्हा एकदा बंगालच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणे सुरु केले.
अरुण लाल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. कसोटी सामन्यात त्यांनी ७२९ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी १२२ धावा केलेल्या आहेत. अरुण लाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९८२ साली इंग्लंडविरोधात खेळताना पदार्पण केले होते. त्यांनी आपला शेवटचा सामना १९८९ साली वेस्टइंडिजविरोधात खेळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!