राणा दाम्पत्याला अटक; आजची रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागणार

0
193
जामखेड न्युज – – – – 
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. राणा दाम्पत्याविरोधात कलम १५३ (अ) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची आजची रात्री पोलीस ठाण्यातच काढावी लागणार आहे. उद्या राणा दाम्पत्याला पोलीस ठाण्यात हजर केलं जाणार आहे. त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. पोलीस ठाण्यात असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब आणि शिवसेनेच्या ५०० कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली दाखल केली आहे.
   आम्ही केवळ हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मातोश्रीबाहेर जाणार होतो. मात्र राजकीय सूडाच्या भावनेनं शिवसेना नेत्यांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याची तक्रार राणा दाम्पत्यानं नोंदवली आहे.कलम १५३ (अ) म्हणजे काय?समाजात तेढ निर्माण करणारं विधान केल्यास कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल होतो. या कलमाच्या अंतर्गत अटकेची कारवाई करायची असल्यास पोलिसांना कलम १४१ नुसार नोटीस बजवावी लागते. अन्यथा ती अटक बेकायदेशीर ठरते. कलम १५३ (अ) दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास ७ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here