जयभीमच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साडेपाच तास चाललेली मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न 

0
220
जामखेड न्युज – – – 
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयशोर, जयभीम, महात्मा फुले की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जय घोषात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक नालंदा बौद्धविहार बाजारतळ येथून सायंकाळी सहा वाजता सजवलेल्या रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सुमारे साडेपाच तास चाललेल्या या मिरवणुकीचा समारोप संविधान स्तंभ येथे करण्यात आला.
    इंजिनीअर कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक म्हणाले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जामखेड शहरात सार्वजनिक आंबेडकर समिती स्थापन करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शहरात दि. १० रोजी वादळवारा फेम अनिरुद्ध वानकर यांचा क्रांतीकारक जलसा कार्यक्रम झाला, दि. ११ रोजी महापुरुषांच्यावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये ३१ जणांनी सहभाग घेतला, दि. १२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यामध्ये १११ जणांनी रक्तदान केले, दि. १३ रोजी सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले यामध्ये १११ जणांची तपासणी करण्यात येऊन औषधे देण्यात आली असे विविध कार्यक्रम तीन दिवस झाले त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला तसेच तहसीलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र सदाफुले, उपाध्यक्ष मुकुंद घायतडक, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, खजिनदार गोकुळ गायकवाड सर, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, सुरेखा सदाफुले, सनी सदाफुले, प्राचार्य विकी घायतडक, प्रा. राहुल अहिरे, राजन समींदर, संदेश घायतडक, दिपक तुपेरे, दिपक सदाफुले, विशाल अब्दुले व समितीचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here