शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी

0
217
जामखेड प्रतिनिधी  
 जामखेड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी येथील शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मार्च २०२२ मध्ये १० वी व १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढे कॉलेज करत असतानाच आर्मी व पोलीस भरतीची तयारी करण्याची संधी प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शिवनेरी अकॅडमी चे संचालक कॅप्टन  लक्ष्मण भोरे (से.नि.) यांनी दिली. याचा फायदा होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन अकॅडमी तर्फे करण्यात आले आहे.
इयत्ता ११ वी ला प्रवेश घेऊन ११ वी १२ वी बरोबरच आर्मी /पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सध्या अत्यंत कमी वयात नोकरी मिळण्यासाठी आर्मी व पोलीस सारखे खात्रीपूर्वक  कोणतेही क्षेत्र नाही. १७.५ वय झाले की आपल्याला आर्मी भरती करता येते, तर १८ पूर्ण झाले की पोलीस भरती करता येते. कोरोना मुळे सर्वच परिस्थिती विस्कळीत झाली होती, आता बदल होत चाललेला आहे. अगोदर नियमितपणे होणारी भरती प्रक्रिया थोडयाच दिवसात सुरु होइल. तसेच बहुसंख्य मुलांचा कल आता या भरतीकडेच असल्याने खूपच स्पर्धा वाढली आहे, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही खास प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते सर्व प्रयत्न शिवनेरी अकॅडमी करणार आहे.
कोरोना मुळे सर्वच परिस्थिती विस्कळीत झाली होती, आता बदल होत चाललेला आहे. अगोदर नियमितपणे होणारी भरती प्रक्रिया थोडयाच दिवसात सुरु होइल. तसेच बहुसंख्य मुलांचा कल आता या भरतीकडेच असल्याने खूपच स्पर्धा वाढली आहे, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही खास प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते सर्व प्रयत्न शिवनेरी अकॅडमी करणार आहे. ११ वी १२ वी करत असतानाच आपण या भरतीची तयारी करून सहज यश मिळवू शकता.
२ वर्षाच्या या कोर्समध्ये रोज २ तास शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम व २  तास लेखी परीक्षेची तयारी करून घेतली जाईल, वय पूर्ण होताच भरतीला उभे करण्यात येईल.
आपला वेळ सत्कारणी लागेल व आत्मविश्वास निर्माण होऊन यशस्वी होणे सहज शक्य होईल. ज्यांना भरती व्हायचे आहे त्यांनी आगामी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे..
आर्मी GD बरोबरच निम लष्करी दलातील BSF, CRPF, ITBP,CISF,SSB,SSD,आसाम रायफल या सर्व ठिकाणी शैक्षणिक पात्रता फक्त 10 वी पास लागते,तर पोलीस भरतीसाठी,12 वी पास हवी, 12 वी सायन्स असेल तर आर्मी क्लार्क,टेक्निकल, नर्सिंग  मध्येही भरती होता येते.आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी अधिक माहिती साठीआजच संपर्क साधून आपल्या सर्व शंकांचे समाधान करून घ्यावे.
अधिक माहितीसाठी शिवनेरी अकॅडमी, जामखेड 9158006663 या नंबरवर, संपर्क साधावा.
 संस्थेची वैशिष्ट्ये
  ८ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत
  अनुभवी कायमस्वरूपी शिक्षकवर्ग गरजूंसाठी होस्टेल व  मेस सुविधा उपलब्ध कमवा आणि शिका योजनेअंतर्गत सहभाग शक्य (जागा मर्यादित) 
 विद्यार्थिनी साठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध.हमखास यशाची पूर्ण तयारी
शिवनेरी अभ्यासिका, हेल्थक्लब व ऑनलाइन computer  सुविधा प्रत्येक शनिवारी शारीरिक व लेखी परीक्षेची पूर्ण तयारी
  विशेष सवलत  माजी सैनिकच्या पाल्यासाठी भरपूर सवलत दिली जाईल
 आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शिवनेरी अकॅडमीला एकवेळ आवश्यक भेट द्या. असे आवाहन शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले आहे की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here