जनतेने ज्यांना डोक्यावर घेतले त्यांना खाली उतरवण्याची ताकद जनतेत आहे – चेअरमन आजीनाथ हजारे

0
250
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – 
सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोधक सांगत आहेत की आम्हीच खरे वारसदार आहेत. मात्र ही दिशाभूल असुन विचारांचा वारसा विरोधकांनी कोठे चालवला आहे.
विरोधकांनी जास्त हवेत राहु नये कारण ज्या जनतेने वरती घेतले त्यांना खाली उतरवण्याची ताकद देखील जनतेत आहे असे मत चेअरमन अजिनाथ हजारे यांनी व्यक्त केले.
जवळा येथील सोसायटीच्या शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या वेळी जवळा गावातुन प्रचार फेरी काढण्यात आली.  गावातील मारुती मंदिर, खाकसार वली बाबा या देवस्थानाचे दर्शन घेऊन ही रॅली जवळेश्वर मंदिरासमोर आल्या नंतर त्या ठिकाणी भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ज्योती क्रांती मल्टीस्टेट चे चेअरमन आजीनाथ हजारे हे बोलत होते.
पुढे बोलताना चेअरमन अजिनाथ हजारे म्हणाले की मी माझ्या व्यवसायात अत्तापर्यंन्त एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच प्रमाणे सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकर्‍यांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील सर्व जण एकत्र येऊन शेतकरी विकास आघाडी पॅनल उभा केला आहे. त्यामुळे भेदभाव बाजुला ठेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी विकास आघाडी पॅनलला निवडुन द्या असे आवाहन केले आहे.
     यावेळी बोलताना प्रशांत पाटील म्हणाले, ही निवडणूक राजकारण करण्याची नसुन शेतकरी सभासदाचे हीत डोळ्यासमोर ठेवण्यासाठी आहे. जवळा सोसायटीची तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. विरोधक हे आज विरोध करत आहेत ते आमच्याच जिवावर निवडुन आले आहेत. ज्या दिवंगत नेत्यांनी संस्थेला योगदान दिले त्या संस्थेची दिशा प्रगतीच्या दिशेने घेऊन जायची आहे. विरोधक नावासाठी राजकारण करत आहेत मात्र आम्ही गावासाठी राजकारण करत आहोत.
     यावेळी शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलचे डॉ. महादेव पवार, दशरथ हजारे, प्रशांत पाटील, राजेंद्र राऊत, डॉ. दिपक वाळुंजकर, अभय नाळे, बाबा महानवर यांनी भाषणे केली यावेळी आदीनाथ कारखान्याचे संचालक राजेंद्र पवार, माजी उपसभापती दिपक पाटील, दत्तात्रय कोल्हे, भिमराव हजारे, सत्तार शेख, सुखदेव मते, शहाजी पाटील, पांडुरंग वाळके, पोपट नाना शिंदे,  महेंद्र खेत्रे, नवनाथ कोल्हे, पठाडे चेअरमन, हुसेनभाई, बबन ठकाण,  पांडुरंग कोल्हे,  मारुती रोडे, गैतम कोल्हे, उमेश रोडे, एकनाथ हजारे, राजेंद्र महाजन, अशोक पठाडे, संजय अव्हाड, आलम शेख, आयुब शेख, रामलिंग बाप्पु, केशव हजारे, महंमद शेख, राजु महाजन व तेरा उमेदवार उपस्थितीत होते तसेच महीला प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here