जामखेड न्युज – – – –
प्रभाग क्रमांक एक लेहनेवाडी येथे अशोक चौधरी यांच्या घरापासून ओढ्यापर्यंंत रस्ता नसल्याने मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. हि गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिल (मामा) बाबर यांनी आमदार रोहित (दादा) पवारांच्या लक्षात आणून दिले आमदार साहेबांनी ताबडतोब या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला यामुळे लेहनेवाडी येथे सुसज्ज सिमेंट रस्ता तयार झाला यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याबद्दल आमदार रोहित पवारांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अनिल (मामा) बाबर, बाळासाहेब मगर, पांडुरंग मगर, अमोल गिरमे, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, प्रविण उगले, वारे, सुधीर सागडे, विष्णु सागडे, भाऊसाहेब जगताप, महेंद्र राळेभात, संजय डोके, बजरंग डोके, दादासाहेब राळेभात, राम बाबर, सुनील उबाळे, उमेश जाधव, ओंकार पवार, राजेंद्र पवार, गोवर्धन जगताप, युवराज सुरवसे, अशोक चौधरी, बाबासाहेब चौधरी, युवराज चौधरी, राहुल जगताप, रोहित जगताप, महादेव जगताप यांच्या सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अशोक चौधरी यांच्या घरापासून ओढ्यापर्यंंत सिमेंट रस्ता बांधकाम लोकार्पण सोहळा अंदाजे ३०० मीटर रूपये १३.५० लक्ष आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून पुर्ण झाला याचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला.