उपमुख्यमंत्री अजित पवार साई दरबारी!!!

0
275
जामखेड न्युज – – – – – 
 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,  श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे,खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, संस्थानचे पदाधिकारी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत उपस्थित होत्या.
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे  शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सुद्धा आगमन झाले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here