आजची आधुनिक पिढी आपल्या घराण्याविषयी अनभिज्ञ आहे. फार तर आजोबा-पणजोबापर्यंत वंशावळ माहिती असते. परंतु नगर जिल्ह्यातील जवळपास ७ हजार मराठा समाजातील घराण्यांचा संपूर्ण इतिहास राजस्थानातील भट परिवाराने ३०० वर्षांपासून जतन केला आहे. आता ही वंशावळ एकत्रितपणे हस्तलिखित स्वरूपात लवकरच सर्वांना पाहता येणार आहे. यात आपले गोत्र, देवक, मूळ गाव, कुलदेवता याची महिती असणार आहे.
आम्ही दर पाच वर्षांनी येतो. जे बोलवतात त्यांची वंशावळ आम्ही सांगतो. नवी माहिती समाविष्ट करतो. आमच्या पूर्वजांनी मोडी लिपीत ही माहिती लिहून ठेवली आहे. आम्ही नव्या पिढीने ही लिपी शिकली आहे. नवीन माहिती आम्ही देवनागरी लिपीत लिहीत आहोत. वंशावळी संरक्षण संस्था राजस्थान ही आमची वेबसाईट आहे.-विजयकुमार ब्रम्हभट, राजस्थान