श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी जामखेड वरून वढु बुद्रुकला धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी रवाना

0
244
जामखेड न्युज – – – – 
छत्रपती संभाजी महाराज शक्ती,भक्ती, धैर्य, त्याग, बलीदानाचे प्रतीक आहेत  स्वधर्म रक्षणाची आग,रग,धग निर्माण करणारे शक्तीपीठ आहे. छत्रपती श्री संभाजी माहाराज बलिदान मास निमित्त जामखेड तालुक्यातील सर्व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी, शिवभक्त जामखेड वरून वढु बुद्रुकला धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी रवाना झाले
     यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे पुजन जामखेडचे  पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, शिवनेरी अकॅडमीचे कॅप्टन लक्ष्मणराव भोरे आणि पत्रकार वराट सुदाम, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने हजर होते.
                         ADVERTISEMENT
.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्य माध्यमातून दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिनाभर अत्यंत कडव्या निष्ठेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी माहाराज बलिदान मास पाळला जातो. संभाजी महाराजांना अत्यंत क्रूर मरणयातना देत ३० दिवस छळ करून हत्या करण्यात आली होती. देहाचे तुकडे करून नदी शेजारी टाकण्यात आले होते. आपल्या हिंदु राजाची निघु न शकलेली अंत्ययात्रा याचे शल्य आज प्रत्येक हिंदुंच्या मनाला आहे.
संभाजी महाराज पकडले गेलेल्या क्षणापासून अतिक्रूर पाशवी छळ सहन करत होते, श्री संभाजी महाराजांचा रोज एक एक अवयव तोडत होते. रोज अंगाची साल सोलून काढत होते . शेवटी फाल्गुन अमावस्येचे दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे तुकडे तुकडे केले. म्हणजेच श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने, बलिदानाच्या मार्गावर, संपूर्ण महिनाभर रोजच अति धीरोदात्तपणे चालत होते. म्हणून शंभुराजेंचे बलीदान प्रत्येक हिंदुंना कळावे यासाठी हा धर्मवीर बलीदान मास हा ज्या ज्या गावात सुर्य उगवतो त्या त्या प्रत्येक गावात, समाजात राहणार्या प्रत्योकाच्या घरी व्हावा याकरीता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे आदरणीय संभाजीराव भिडे गुरूजींनी केलेला हा एक उपक्रम आहे.
प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिना प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून ।।धर्मवीर बलिदान मास ।। पाळला जातो. जामखेड तालुक्यातील अनेक गावात रोज नित्य नियमाने छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दाजंली वाहली जाती सर्व तरुण एकत्र येऊन ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन महिनाभर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत चा हा महिना सुतकाचा म्हणुन पाळतात या महिन्यात सर्व धारकरी, शिवप्रेमी आपल्या आवडत्या गोष्टी वर्ज करतात कि जेने करून महाराजांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये यासाठी धारकरी व शिवप्रेमी एक महिना चहा न पिने, गोड न खाणे,  गादीवर न झोपने,  पायात चप्पल न घालणे, फक्त एकवेळ जेवन करणे याप्रकारे व्रताच पालन करतात. महीन्याच्या शेवटी संभाजी माहाराजांचे समाधी स्थळ वढू बुद्रुक या ठिकाणाहून धर्मवीर ज्वाला आणली जाते व आपल्या राजाची न निघालेल्या यात्रेची मनात सल असल्याने बलीदान मासच्या शेवटच्या दिवशी ती ज्वाला घेऊन मुक शोक अंत्य यात्रा आपल्या गावात काढली जाते. धर्मवीर ज्वाला म्हणजे नुसती ज्वाला‌ नसुन धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या शक्ती,भक्ती, धैर्य, त्याग, बलीदानाचे प्रतीक आहे  स्वधर्म रक्षणाची आग,रग,धग निर्माण करणारे शक्तीपीठ आहे. निपचित पडलेल्या हिंदु मनात स्वाभिमान उत्पन्न करणारे ऊर्जास्रोत आहे.
ज्यांच्या अद्वितीय बलिदानाने महाराष्ट्र कणखर झाला त्या शंभुराजांच्या बलिदानाची जाणीव,चीड, सल आमच्या मनात तेवत ठेवणारी ही ज्वाला आहे.
तसेच १ एप्रिल छत्रपती संभाजी महाराज पुण्यातीथी निमित्ताने संध्याकाळी शहरात मुक शोकपदयात्रा निघुन श्री विठ्ठल मंदीर येथे संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत शिवचरित्रकार ह.भ.प. अशोक पवार महाराज यांची किर्तन सेवा होऊन शंभुराजेंना सामुहीक आदरांजली वाहण्यात येनार आहे तरी सर्व शिवप्रेमी व धारकर्यांनी उपस्थित राहावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here