सरकारी कर्मचारी यांना दमदाटी, मारहाण करुन त्यांच्या कामात अडथळा आणणा-या दोन आरोपींना कोर्टउठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी वीस हजार रुपये दंड

0
306
जामखेड न्युज – – – – 
    चार वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे पुसेगाव पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक असताना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन आरोपींनी सरकारी कर्मचारी यांना दमदाटी, मारहाण करुन त्यांच्या कामात अडथळा आणला होता.तेव्हा  तानाजी वलेकर व सचिन राजगे या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून महत्त्वाचे साक्षीदार जबाब नोंदवून पुरावे गोळा केले बारकाईने तपास केला त्यामुळे दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून आरोपींना कोर्टउठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी वीस हजार रुपये दंड ठोठावला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यामुळे आरोपींना शिक्षा झाली आहे.
                      ADVERTISEMENT 
सविस्तर माहिती अशी की, चार वर्षांपूर्वी
1. पोलीस स्टेशन- पुसेगाव पोलीस स्टेशन
2. गुन्हा रजिस्टर नं. ०६/२०१८
3. कलम- भा.दं.वि. कलम ३०७, ३५३, ३३२, ३२३,५०४,५०६, ३४
4. सेशन केस नं. १४/२०१८
5. फिर्यादी-किरण तानाजी पवार, नोकरी – तलाठी कटगुण ता.खटाव जि. सातारा
6. आरोपी-१) तानाजी खाशाबा वलेकर, वय. ३८
२) सचिन दादा राजगे, वय-३५
दोघे- रा. पिंपरी ता. माण जि. सातारा
७. अ.घ.ता. वेळ ठिकाण- मौजे वर्धनगड गावचे हद्दीत वर्धनगड बसस्टॉपचे पुढे
थोडे अंतरावर वर्धनगड घाटाचे माथ्याकडुन दुसरे वळणावर सातारा ते पंढरपुर रोडपुर व मौजे रामोशीवाडी ता. कोरेगाव हद्दीत वर्धनगड घाटातील सातारा पंढरपुर ते रामोशीवाडी
जोडरस्तावर विठ्ठल गणपत सावंत यांचे जमीन गट नं. २६ चे उत्तरेस ५ फुट अंतरावर पोलीस ठाण्याचे दक्षिणेस ९ किमी अंतरावर.
     थोडक्यात हकिकतवरील तारखेस, वेळी व ठिकाणी याकेसमधील फिर्यादी व साक्षीदार यांना आरोपी
नं. १ याचे ताब्यातील बेकायदेशीर व बिगरपरवाना.वाळुने भरलेला डंपर क्रमांक एम. एच. ११/ बी.डी. ७६ हा वाहतुक करीत असताना मिळुन आला. त्यावेळी डंपर मालक आरोपी नं. २ त्याचे फॉरच्युनर गाडी क्रमांक एम. एच. ११/१११ मधुन येवून त्यांचे डंपरवर कायदेशीर कारवाई करु नये. म्हणुन आरोपी नं. १ व २ यांनी डंपर वळवून घेतो असे सांगुन तो रोडने तसाच कोरेगाव बाजुकडे रामोशीवाडी ता. कोरेगाव हद्दीत विठ्ठल गणपत सावंत यांचे विटभट्टी लगत असले रामोशीवाडी जाणारे रोडवर आणुन तेथे डपरमधील वाळु खाली केली व तो डंपर घेवुन जावु लागला. म्हणुन यातील फिर्यादी व साक्षीदार हे डंपर थांबविणेस गेले असता आरोपी नं. २ याने या सर्वांना गाडीखाली चिरडुन टाक असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी चालु केली, तेव्हा आरोपी नं १ याने
फिर्यादी व साक्षीदार यांचे अंगावर डंपर घालुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केले ते रोडवरुन बाजुला झालेने डंपर तेथुन निघुन गेला व आरोपी नं २ याने फिर्यादीस
धक्काबुक्की करुन मारहाण करुन त्यांचे शासकीय कामात अडथळा निर्माण केला व त्यांना बघुन घेतो अशी धमकी देवून निघुन गेला म्हणून वगैरे मजकुरची तक्रार दिल्याने गुन्हा पुसेगाव पोलीस स्टेशन येथे दि. ०६/०१/२०१८ रोजी रजिस्टर करण्यात आला होता.
   सदर केसकामी श्री. गणेश किंद्रे, DYSP कोरेगाव विभाग व श्री.संदीप शितोळे, सपोनि पुसेगाव पो. स्टे यांचे मार्गदर्शन मिळाले. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहा.
पोलीस निरीक्षक श्री. संभाजी ए. गायकवाड, पुसेगाव पोलीस स्टेशन यांनी केला. त्यांनी सदर गुन्हांतील महत्वाचे साक्षीदारांचे जबाब नोंदविले, इतर कागदोपत्री पुरावा जमा
केला. तसेच सदर गुन्हायातील आरोपीला अटक केले. तसेच बारकाईने तपास करुन आरोपीविरुध्द मा. जिल्हा न्यायालय, वडूज येथे दोषारोप दाखल केले. वडूज येथिल
मा. जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकार पक्षाच्या वतीने श्री. अजित. पी. कदम व श्रीमती अनुराधा निंबाळकर, सहा.जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिले. यामध्ये ७ साक्षीदार सरकार पक्षाच्यावतीने तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब,
कागदोपत्री पुरावा, वैदयकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन श्री. पी. वाय. काळे, अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी आरोपीला दोषी ठरवून
दि. २९/०३/२०२२ रोजी आरोपी – १) तानाजी खाशाबा वलेकर, वय. ३८ २) सचिन दादा राजगे, वय-३५
दोघे-रा. पिंपरी ता. माण जि. सातारा भा.दं.वि.सं. कलम ३५३, ३४ प्रमाणे दोघांना कोर्टउठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी दंड र.रु. १०,०००/- व दंड न भरलेस दोन महिने ज्यादा शिक्षा भा.दं.वि.सं. कलम ३३२, ३४ प्रमाणे दोघांना कोर्टउठेपर्यंत साधी कैद व प्रत्येकी दंड र.रु. १०,०००/- व दंड न भरलेस दोन महिने ज्यादा शिक्षा प्रमाणे शिक्षा दिली. याकामी सरकारी वकील यांना पुसेगाव पोलीसचे प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे ASI श्री.दत्तात्रय जाधव, तसेच म.पो.हवा. दडस मॅडम, पो.कॉ. अक्षय शिंदे, पो.कॉ. जयवंत शिंदे, पो.कॉ. सागर सजा यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here