जामखेड न्युज – – – –
आगामी काळात विविध सण उत्सव, यात्रा तसेच निवडणूकांच्या अनुषंगाने जामखेड पोलीसांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रूट मार्च व दंगा काबू पथकाची रंगीत तालीम सादर करण्यात आली. अचानक उद्भवलेला जमाव पांगविण्यासाठी काय करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
ADVERTISEMENT

आज दिनांक २६ रोजी सायंकाळी आगामी सण उत्सव तसेच निवडणूक अनुषंगाने जामखेड शहरात रूट मार्च घेण्यात आला तसेच खर्डा चौक जामखेड येथे दंगा काबु योजनाची रंगीत तालीम राबविण्यात आली. या दंगा काबू योजना रंगीत तालीम सादर करताना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोसई राजू थोरात ,पोसई अनिल भारती ,सफो परमेश्वर गायकवाड, पोलीस हवालदार शिवाजी भोस, संजय लोखंडे, सचिन सगर तसेच गोपनीय विभागचे पोलीस नाईक अविनाश ढेरे सह 15 पोलिस अंमलदार व 12 होमगार्ड या प्रात्यक्षिक साठी हजर होते. तसेच नायब तहसीलदार श्री मनोज भोसेकर, नगरपरिषद येथील अग्निशमनची गाडी, ग्रामीण रुग्णालय येथील अँबुलन्स स्टाफ असे खर्डा चौक जामखेड येथे हजर होते.
दंगा काबू योजना रंगीत तालीम करताना तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता काय उपाययोजना करता येतील त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच जमावाला कसे पांगवण्यासाठी काय केले पाहिजे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.