देशातील नऊ कोटी कामगारांचा एल्गार! दोन दिवसीय संपाची हाक, ‘या’ दिवशी होईल गैरसोय

0
230
जामखेड न्युज – – – – 
केंद्र सरकारने विविध क्षेत्रात लावलेला खासगीकरणाचा धडाका थोपवण्यासाठी देशातील कामगार संघटनांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. २८ आणि २९ मार्च रोजी भारतीय मजदूर संघ सोडता इतर सर्व मध्यवर्ती कामगार संघटना सहभागी होणार असून त्यांचे सभासद जवळपास नऊ कोटी कामगार आहेत. यामुळे बँका, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूकदार संघटना, वीज कंपन्या तसेच बडे खासगी उद्योगांची सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. सोमवार २८ मार्च आणि मंगळवार २९ मार्च असे दोन दिवस नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
                        ADVERTISEMENT 
या राष्ट्रीय संपात कर्मचारी संघटना, उद्योग निहाय कामगार तसेच कर्मचारी संघटना, बँक, विमा उद्योगातील कर्मचारी तसेच कांही अधिकारी संघटना , असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार तसेच कर्मचारी मिळून ९ कोटींवर कामगार, कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत.
हा संप प्रामुख्याने नवीन कामगार कायद्याच्या विरोधात आहे तसेच सरकार सरसकट सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे जे खासगीकरण करू पाहत आहे त्याच्या विरोधात आहे. याशिवाय सरकार, सार्वजनिक तसेच खाजगी उद्योगातून कायम स्वरूपी रिकाम्या जागा न भरता सरसकट आऊटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीचा अवलंब करून कामगारांचे जे शोषण केले जात आहे त्याच्या विरोधात आहे . याशिवाय नवीन कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हा आग्रह देखील संघटनांच्या वतीने धरण्यात येत आहे.
बॅंकातील एआयबीईए, एआयबीओए, बेफी या तीन संघटना मिळून पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी तसेच अधिकारी या संपात सहभागी होत आहेत. या संपात बँक संघटनांच्या वतीने प्रामुख्याने बँक खासगीकरणाला विरोध ही मागणी पुढे रेटण्यात येत आहे. सरकार तर्फे लोकसभेच्या या अधिवेशनात कुठल्याहि क्षणी बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडण्यात येऊ शकते हे लक्षात घेता बँक कर्मचारी संघटना बँक खाजगीकरण विरोधातील आपले आंदोलन अधीक तीव्र करण्याच्या पवित्र्यात आहेत.
या संपात बहुसंख्य बँक कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांची दोन नंबरची मोठी संघटना एआयबीओए सहभागी होत असल्यामुळे स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सोडता इतर सर्व बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प होइल. या संपात जुन्या जमान्यातील खाजगी बँका, कांही विदेशी बँका, ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारी देखील या संपात सहभागी होत आहेत.
या संपात बँक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाची कुठलीच आर्थिक मागणी अंतर्भूत नाही तर देशातील सामान्य माणसाची शंभर लाख कोटी रुपयापेक्षा जास्तची बचत सुरक्षित राहावी यासाठी बँकिंग सार्वजनिक क्षेत्रात राहावे म्हणून बँक कर्मचारीवर्ग हा संप करत आहेत हे लक्षात घेता बँक ग्राहक तसेच जनतेने या संपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचे नेते देवीदास तुळजापूरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here