जामखेड न्युज – – – –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) युवा आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानले आहेत. रोहीत पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जाणाऱ्या चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड’ या राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 548 D) जामखेड-सौताडा या टप्प्यासाठी १५७.६२ रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी ट्वीट करून नितीन गडकरी यांचे आभार मानले. रोहीत पवार म्हणाले की, “माझ्या मतदारसंघातील लोकांच्यावतीने केलेल्या विनंतीला मान देऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहेबांनी ‘चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड’ NH 548 D या महामार्गातील जामखेड-सौताडा या टप्प्यासाठी १५७.६२ कोटी रूपये मंजूर केले. याबाबत गडकरी साहेब आपले मनापासून आभार!”
ADVERTISEMENT 

तत्पूर्वी काहीच दिवसांपूर्वी रोहीत पवार यांनी विविध विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. कर्जत जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड या ५४८ D या प्रमुख महामार्गासंदर्भातही या दोघांमध्ये चर्चा झाली होती.