जामखेड न्युज – – –
जामखेड न्युज इफेक्ट
करमाळा जामखेड रस्त्याच्या कडेने सध्या केबल टाळण्यासाठी खोदकाम सुरू आहे ते अगदी रस्त्याच्या लगतच सुरू आहे ते नियमबाह्य अनाधिकृत काम सुरू आहे हे ताबडतोब थांबवावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे. अशा आशयाची बातमी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाने अनाधिकृत केबल टाकणार्या रिलायन्स कंपनी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT 

जामखेड नान्नज रस्त्यालगत अनाधिकृत केबल टाळण्यासाठी अगदी डांबरीच्या शेजारी खोदकाम सुरू आहे. नियमानुसार पंधरा मीटर दूर खोदकाम करून केबल टाकण्याचे काम करावयास हवे होते पण ते अगदी जवळच सुरू आहे यामुळे पावसाळ्यात चिखल होऊन अनेक अपघात होतील त्यामुळे हे काम ताबडतोब थांबवावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला होता. अशी बातमीही प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत बांधकाम विभागाने रिलायन्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सी. डी. बांगर यांनी अनाधिकृत केबल टाकणार्या रिलायन्स कंपनी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला आहे.