Tag: #दिनकर टेमकर राज्याचे नवे शिक्षण संचालक

  • दिनकर टेमकर राज्याचे नवे शिक्षण संचालक – जिल्ह्याच्या सुपुत्राला संधी

    जामखेड न्युज – – – 
    राज्याचे शिक्षण संचालक म्हणून विद्यमान सहसंचालक दिनकर टेमकर यांना पदोन्नती देण्यात आली. ते पाथर्डी
    तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र आहेत.
    टेमकर यांनी यापूर्वी शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, सहाय्यक शिक्षण, एससीइआरटीचे संचालक आदी पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे.
    स्मितभाषी, कर्तव्यदक्ष, अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची राज्याच्या शिक्षण विभागात ओळख आहे. राज्याच्या शैक्षणिक धोरणाला दिशा  देण्याचे काम त्यांनी केले आहे.
    शिक्षण विभागाशी संबंधित अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे.
       प्राथमिक शिक्षणाचा आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आलेला असल्याने, शिक्षण संचालक पदाच्या कालावधीत
    राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागाचे महत्त्वाचे प्रश्र निश्चित मार्गी लागतील, अशी आशा राज्यातील प्राथमिक
    शिक्षकांनी व्यक्त केली आहे. टेमकर यांना मिळालेल्या पदोन्नतीनंतर भोसे, करंजी गावासह पाथर्डी तालुक्यात
    पेढे वाटून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.
error: Content is protected !!