Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या पुष्पा-डॉन`च्या गँगवॉरने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा – आमदार विनायक मेटे

पुष्पा-डॉन`च्या गँगवॉरने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा – आमदार विनायक मेटे

0
268
जामखेड न्युज – – – – – 
शहरात निर्ढावलेल्या पुष्पा व डॉन गँग कार्यरत असून या दोन्ही गँगची मस्ती वाढल्याने जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या (Beed) नाकावर टिच्चून या गँगने कायदा सुव्यवस्थेचे १२ वाजविल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Mla Vinayak Mete) यांनी केला. जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्थेचे तीन- तेरा वाजल्याचे सांगत त्यांनी टीका केली. (Marathwada)
काही दिवसांपूर्वी एका भाषणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुष्पा सिनेमातील ‘मै झुकूंगा नही’या डायलॉगला डॉ. योगेश क्षीरसागर यांनी ‘मै हूं डॉन’म्हणत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी शहरात गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी १६ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा, दरोडा अशा विविध कलमांन्वये गुन्हे नोंद झाले.
गुन्हे नोंद झालेल्यांत क्षीरसागर कुटुंबियांतील पाच जणांचा समावेश आहे. याच कालावधीत जिल्ह्यात खुनाच्या पाच घटना घडल्या असून प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांचाही सिलसिला सुरुच आहे. यावर मेटे यांनी पत्रकार परिषदेत मत मांडले. मेटे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गोळीबार होऊन देखील अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्यांना कसलाच धीर दिला नाही.
हायप्रोफाईल आरोपी असल्याने पोलिसांना सापडत नाहीत. गोळीबार, भाऊबंदकी, जमिनवाद, अतिक्रमण यामुळे गँगवॉर भडकल्याने सामान्य बीडकर घाबरले आहेत. क्षीरसागर फॅमीलीच्या दहशतीपुढे सरकारी यंत्रणाही गप्प आहेत. मात्र, पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने कर्तव्य पार पाडावे. जिल्हाधिकारी कार्यालय शिवसेनेचे सैनिक म्हणून तर पोलिस अधीक्षक कार्यालय राष्ट्रवादीचे सैनिक असल्यासारखे वागत असल्याचा गंभीर आरोपही विनायक मेटे यांनी केला.
जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा; पंकजा मुंडेंचे गृहमंत्र्यांना पत्र
जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थे प्रश्नी आपण चार वेळा गृहमंत्र्यांना विनंती केली. गृहमंत्री व मुख्यमंत्री लक्ष घालणार नाहीत तोपर्यंत जिल्ह्यात बदल अशक्य असल्याचेही ते म्हणाले. गँगवॉर करणाऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीने या कार्यालयातील सिसीटीव्ही गायब केल्याचा आरोप करत पोलिस का घाबरतात, असा सवालही त्यांनी केला.
ज्या जमिनीसाठी क्षीरसागरांची भांडणे सुरु आहेत, ती देवस्थानची जमिन असल्याचा दावा करत शासनाने देवस्थानच्या सर्वच जमिनी ताब्यात घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तर हे समाजाचे मुडदे पाडतील असा, इशाराही मेटेंनी यावेळी दिला. शहरभर सिसीटीव्ही बंद असल्याने यापुढे पुष्पा व डॉन गँग पिस्तुल काढतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
 किलोमीटपर्यंत पाटण बाजूलाही रेड झोन आहे. वरूंजीसहीत मुंढे, विजयनगर, पाडळी, केसे, सुपने आदी गावे १०० टक्के तर गोटे गावचा निम्मा भाग रेड झोनमध्ये आहे. त्यांना नाहरकत दाखल्यासाठी दिल्ली येथील परवानगी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!