पाटोदा, खामगाव व भवरवाडी येथील युवा सेनेच्या वतीने संजय काशिद यांचा भव्य सत्कार

0
308
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – – – 
     नगर जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील पाटोदा, खामगाव व भवरवाडी येथिल युवा सेनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
    यावेळी मयुर भोसले सर, दिपक सुरसे, पांडुरंग शिंदे, जगदीश भाकरे, शुभम कोहकडे, बालाजी खेत्रे, आजीनाथ गायकवाड, मनोज भाकरे, प्रेमराज पवार, दत्ता भाकरे, नाना पवार यांच्या सह अनेक युवा सैनिक हजर होते.
 राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आज सोमवारी आदेश जारी केला असून त्यामध्ये संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित दोन सदस्य, त्याचबरोबर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार नामनिर्देशित सदस्य, आणि विशेष निमंत्रित 14 सदस्य अशा एकूण वीस सदस्यांची नियुक्ती जिल्हा नियोजन समितीमध्ये असणारा आहेत.
जिल्हा समितीचे अध्यक्ष अर्थातच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ हे असणार आहेत तसेच जिल्हाधिकारी सदस्य सचिव जिल्हा नियोजन समितीवर म्हणून काम पाहतील.
शासनाने नियुक्त केलेले सदस्य याप्रमाणे..
संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य-
१)सदाशिव किसन लोखंडे, लोकसभा सदस्य शिर्डी मतदारसंघ.
२) लहू नाथा कानडे, विधानसभा सदस्य, श्रीरामपूर मतदार संघ
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य-
१) प्रभाकर रघुनाथ गाडे (राहणार बारागाव नांदुर तालुका राहुरी)
२) अविनाश गोविंदराव आदिक (राहणार श्रीरामपूर)
३) बाबासाहेब दिघे (राहणार श्रीरामपूर)
४) हर्षवर्धन अशोक बोठे (राहणार वाळकी तालुका जिल्हा अहमदनगर)
विशेष निमंत्रित सदस्य –
१)डॉ. नरेंद्र घुले पाटील (रा-शेवगाव)
२)ऋषिकेश प्रताप ढाकणे(र-पाथर्डी)
३)बाबासाहेब भिमाजी तरटे (राहणार भाळवणी तालुका पारनेर)
४) पोपटराव गणुजी दराडे (राहणार समशेरपूर तालुका अकोले)
५) सोनाली राहुल रोहमारे (राहणार बोरावके वस्ती धारणगाव रोड कोपरगाव)
६) प्रवीण विठ्ठल घुले (राहणार कर्जत)
७) बी आर चकोर (राहणार संगमनेर)
८) मधुकर नवले (राहणार अकोले)
९) जयंत रामनाथ वाघ (अहमदनगर)
१०)विशाल राजेंद्र झावरे (राहणार काळे मळा कोपरगाव)
११)संजय नारायण काशीद (राहणार मुंजोबा गल्ली मेन रोड जामखेड)
१२) शरद मधुकर झोडगे (राहणार नागरदेवळे तालुका नगर)
१३) भागवत बाळासाहेब मुंगसे (राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी)
१४) अभिजीत भगवान खोसे (राहणार-संयम अपार्टमेंट, बुरुडगाव रोड अहमदनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here