जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार विकासपुरुष मा.रोहित (दादा) पवार कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून जामखेड तालुक्यातील साकत येथे हनुमंत पाटील मित्रमंडळाच्या वतीने ग्रामदैवत श्री साकेश्र्वर मंदिरात महाआरती करण्यात आली.
ADVERTISEMENT 

साकत परिसरात साकेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते जेव्हा जेव्हा काही संकट येते तेव्हा परिसरातील भक्त मंडळी देवाला साकडे घालतात व अनेक वेळा ही संकटे दूर झालेली आहेत. दोन दिवसांपूर्वी कर्जत-जामखेड चे लोकप्रिय आमदार विकासपुरुष रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा मतदार संघातील नागरिकांनी रोहित दादांना लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून कोणी अभिषेक तर कोठे महाआरती करून देवाला साकडे घालण्यात येत आहे.

साकतचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री साकेश्र्वर मंदिरात साकडे घालताना व महाआरती करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस तथा सरपंच मा.हनुमंत (काका) पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ वराट, नागेश वराट, विठ्ठल वराट, गणेश मुरुमकर, रामहारी वराट, संतोष मुरुमकर, सतिश लहाने, दत्तात्रय मुरुमकर, कैलास सानप, ऋषिकेश सानप, ऋषिकेश मुरुमकर, सुनिल भालेराव सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.