जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड पोलिस स्टेशन व सतरा महाराष्ट्र एनसीसी बटालियन अहमदनगर वतीने पोलीस रेझिंग डे निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये शस्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
जामखेड चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के प्रमुख उपस्थिती कन्या विद्यालय मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी उपप्राचार्य तांबे पी एन, पर्यवेक्षक साळवे डी एन व प्रकाश सोनवणे, प्रा रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयुर भोसले, पो.हे. कॉ .भगवान पालवे, पो हे कॉ .रमेश फुळमाळी, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव ,विजय धुमाळ, व पत्रकार एनसीसी छात्र व नागेश व कन्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश
फुलमाळ यांनी एस.एल.आर, रायफल, कार्बाइन मशीन गन, आश्रू गॅस ,9 एम एम पिस्टल ,ग्रीनेड यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्याचप्रमाणे नक्षलवाद, आतंकवाद या संदर्भात माहिती दिली. प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, एसीसी केडेट यांनी शास्त्राची हाताळणी केली.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर श्री नागेश विद्यालय युनिटचे’ ए ‘ प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने महिला व विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी माहिती फलक व संपर्क नंबर याचा बोर्ड नागेश व कन्या विद्यालय याना देण्यात आले.
सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मुलींनी व महिलांनी आम्हाला आपला मोठा भाऊ समजावे , आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे ,मनावर नियंत्रण असल्यावर चुकीचे कृत्य घडत नाही असे प्रतिपादन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
विद्यार्थ्यांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे तसेच वाईट ग्रुपच्या संगतीत न जाता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून देशहिताचे कार्य करावे तसेच विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या मार्गदर्शनासाठी ही आम्ही मार्गदर्शन करू , विद्यार्थिनीच्या सुरक्षितेसाठी 10 91 तसेच 100 नंबर डायल करून आम्हाला माहिती कळवावी.
विद्यार्थिनीने भरोसा पेटीचा उपयोग कोणी जर त्रास देत असेल किंवा आपल्या मैत्रिणीला काही त्रास होत असेल तर त्याची माहिती भरोसा पेटी मध्ये टाकावे. गावात ,समाजात ,रस्त्याने, काही त्रास होत असल्यास भरोसा पेटीचा वापर करावा. सोशल मीडियाद्वारे अनेक फसवणूक होत असते त्या संदर्भात आपल्याला कायद्याचे संरक्षण आहे. विद्यार्थी जीवनात मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा व वाचन संस्कृती जपावी , एनसीसीचे एकता व अनुशासन कौतुकास्पद आहे. असे मनोगत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश बोलभट तर आभार प्रदर्शन एनसीसी प्रमुख मयूर भोसले यांनी केले.