जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नऊ विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दत्ता काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रू सरोदे होते यावेळी राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, जाहेद बागवान, विजयकुमार हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर सह सर्व विद्यार्थी हजर होते.
यावेळी लक्ष्मी वराट हिने भाषण व गीताच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सांगितले तसेच सिद्धी वराट, प्रणिती मुरुमकर, राधिका शिंदे, ऋतुजा वराट, प्रियंका डोके, सिद्धी मुरुमकर, श्रेया वराट, प्रतिक्षा तांबे
यांनी भाषणे केली. तर विजयकुमार हराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात काळे साहेब यांनी चांगले गुण आत्मसात करून कर्तृत्व सिद्ध करण्याचा सल्ला दिला
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुलभा लवुळ यांनी केले तर आभार सुदाम वराट यांनी मानले