जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संजय भोरे मित्रमंडळाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य शरद काका भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या उपस्थितीत अभिष्ठचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी मोठय़ा संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

देवदैठण येथे १जानेवारी २०२२ रोजी माजी मंत्री प्रा राम शिंदे साहेब यांचा वाढदिवसाच्या अभिष्टंचितंन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या उपस्थितीत मध्ये डॉ संजय मित्र परिवार देवदैठण
यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव भोरे, ग्रामपंचायत सरपंच हर्षा संतोष महारनवर व ग्रामस्थ देवदैठण यांच्या वतीने माजी जि प सदस्य शरदकाका भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला या वेळी सरपंच हर्षा संतोष महारनवर प्रा राम शिंदे साहेबांचे आैक्षण केले व माजी मंत्री व भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे साहेब यांनी ग्रामस्थ देवदैठण वासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व वाढदिवस साजरा केल्या बद्दल देवदैठण वासीयांचे आभार मानले.