नविन वर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार – पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड

0
251
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – 
 ३१ डिसेंबर डिसेंबर बाबत शासनाचे आदेशानुसार ३१ डिसेंबर रात्री ९ ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ५ व्यक्तींपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये, सार्वजनिक किंवा वैयक्तिक ठिकाणीही कोणतीही फटाक्यांची किंवा इतर कशाचीही आतषबाजी करू नये अन्यथा पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिला आहे.
  जामखेड तालुक्यातील जनतेला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी नवीन वर्षाच्या स्वागतसाठी घराबाहेर न पडता घरातच कार्यक्रम करण्याच्या सूचनाही दिल्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना त्यांनी सांगितले की जनतेच्या जिवीताचे रक्षण करण्यासाठी शासन योग्य ते निर्णय घेत असते. त्यानुसारच शासनाने दि. ३१ डिसेंबर डिसेंबर बाबत शासनाचे आदेशानुसार ३१ डिसेंबर रात्री ९ ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ५ व्यक्तींपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये, सार्वजनिक किंवा वैयक्तिक ठिकाणीही कोणतीही फटाक्यांची किंवा इतर कशाचीही आतषबाजी करू नये हा निर्णय घेतलेला आहे.
 ओमिक्राॅनचा धोका जामखेड व परिसरातील लोकांना होऊ नये यासाठी कडक कारवाई करण्यावर आमचा भर आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे.
      कोविड १९ व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन व नगर परिषदेच्या वतीने संयुक्तरित्या दंडात्मक कारवाईस करण्यात आली.
  देशासह महाराष्ट्र राज्यात वाढत जाणार कोविड १९ व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर पावले उचलत असून त्या आज जामखेड शहरात तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कारवाईची मोहिम सुरू केली असून संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार  विनामास्क फिरणारे, रस्त्यावर थुंकणारे, वाहन नियमांचे उल्लंघन करणारे यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. ही कारवाई व्यापकरित्या व कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे  पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here