जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणांवरून भावकीत दोन गटात भांडणे होत होती. यातच दि. २४ रोजी रात्री झालेल्या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला सात जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील साकत येथे दि. २४ रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास झालेल्या मारामारीत एका गटाने फिर्यादी व त्यांच्या साथीदारास बेदम मारहाण करण्याची घटना घडली यात फिर्यादी व त्यांचा साथीदार जखमी झाला आहे.
या घटनेत आरोपींनी तलवार, कुर्हाड, कोयता व काठीने फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व पुन्हा जर नादी लागले तर अशी अवस्था करू अशी धमकी दिली या प्रकरणी पांडुरंग नागनाथ अडसुळ वय ३३ जेसीबी आॅपरेटर याने दि. २५ रोजी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील जगन्नाथ उर्फ दादा पोपट अडसुळ, ज्ञानेश्वर पोपट अडसुळ, भाऊसाहेब चत्रभुज मुरुमकर, पप्पू अश्रू अडसुळ, बाळू हनुमंत अडसुळ, हनुमंत विष्णू अडसुळ, पोपट बापुराव अडसुळ या सात जणांविरोधात गुन्हा रजि. नंबर कलम ५४१/२०२१ भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी व आरोपी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद झालेले आहेत अशाच एका वादात फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीस मदत केली होती याचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री फिर्यादी व मित्रावर जोरदार हल्ला केला यात फिर्यादी व मित्र गंभीर जखमी झाले आहेत हि घटना ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घडली
मारहाणीत महेश भागवत लहाने व फिर्यादी पांडुरंग अडसुळ हे दोघे जखमी झाले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.





