Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट संस्थेच्या संचालकपदी सौ.धनलक्ष्मी आजिनाथ हजारे दुसर्‍यांदा बिनविरोध 

फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट संस्थेच्या संचालकपदी सौ.धनलक्ष्मी आजिनाथ हजारे दुसर्‍यांदा बिनविरोध 

0
312
जामखेड प्रतिनिधी 
                   जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
केंद्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट या संस्थेच्या संचालकपदी ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेच्या संचालिका सौ.धनलक्ष्मी आजिनाथ हजारे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्त्तरातून अभिनंदन होत आहे.
      ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेच्या अध्यक्ष यांनी जामखेड तालुक्यातील जवळा या ग्रामीण भागात ज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून रोजगार निर्मिती केली. ग्रामीण भागात सुरू झालेल्या पतसंस्थेने हळुहळु प्रगती करून तालुक्यात पतसंस्थेच्या शाखा काढल्या. ज्योती क्रांती पतसंस्थेच्या अध्यक्षा धनश्री हजारे यांचे पती आजीनाथ हजारे यांनी लक्ष घालून पतसंस्थेचा आलेख वाढता ठेवून पतसंस्थेचे मल्टीस्टेट मध्ये रूपांतर करून राज्यात ४८ शाखा व राज्याबाहेर शाखा झाल्या आहेत.
        ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि.च्या संचालिका सौ.धनलक्ष्मी हजारे यांचे संस्थेचे चेअरमन अजिनाथ हजारे आणि संचालक मंडळाने अभिनंदन केले. अहमदनगर जिल्हा सी.ए.असो.चे संचालक पवन दरक, अ.भा.मराठी नाटय परिषद, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अमोल खोले, अक्षर विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम पठारे यांनी सौ.हजारे यांच्या निवडीबद्द्ल अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!