Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या टीईटी परीक्षा प्रकरणी अटकसत्र सुरु, बंगळुरुतून आश्विन कुमार, बीडमधून संजय सानपला पोलीसांनी...

टीईटी परीक्षा प्रकरणी अटकसत्र सुरु, बंगळुरुतून आश्विन कुमार, बीडमधून संजय सानपला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

0
252
जामखेड न्युज – – – 
टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी कुंपणानंच शेत खालल्याचं समोर आलंय. टीईटी पेपर फुटी प्रकरणी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याला अटक झालीय. तुकाराम सुपेचं कालचं निलंबन करण्यात आलं आहे. तर, बीडमधून आणखी संजय सानप याला अटक झालीय. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय.
बंगळुरुतून एकाला अटक
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता. सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीय. यापूर्वी डेरेंना निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.
संजय सानपला बीडमधून अटक
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी एकाला बीड मधून अटक केली. संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्यास अटक करण्यात आलीय.
तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकजण अटकेत
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीतून टीईटी परीक्षेचा घोळ समोर आला. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. सुपेच्या चौकशीनंत पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना 88 लाख रोख आणि सोनं मिळून 89 लाखांचा ऐवज जप्त केला होता. पोलिसांनी सोमवारी आणखी एकदा छापा टाकून 1 कोटी 59 लाखांची रोकड आणि 70 लाखांचं सोनं जप्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!