जामखेड न्युज – – – /
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ,या भावनेतूनच आपण समाजातील निराधार व वंचित लेकरांसोबत आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करावा या आदर्श संकल्पनेतून ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेड येथे चेंटमपल्ले कुटुंबियांनी आपली कन्या अनुष्का हिचा ९वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी निवारा बालगृहाचे संस्थापक अॅड.अरुण जाधव ,प्रहार तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, यश ड्रायव्हिंगचे संचालक संभाजी वटाणे,सिध्दीविनायक प्रतिष्ठानचे सचिन देशमुख ,पञकार संजय वारभोग,युवा उद्योजक भागिनाथ उगले, तेलंगशी शाळेचे मुख्याध्यापक अनंता गायकवाड ,संतोष गोरे ,विजयकुमार रेणुके,अर्चना रेणुके, रामदास राजगिरवाड, सुशेन चेंटमपल्ले,जमुना चेंटमपल्ले, व हिंदवी चेंटमपल्ले यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवारा बालगृहातील अनाथ व वंचित विद्यार्थ्यांना अल्पोपहार व शैक्षणिक साहित्य देऊन अनुष्काचा वाढदिवस साजरा केला.आजच्या प्रचलित वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तेलंगशी शाळेतील आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री.सुशेन चेंटमपल्ले व त्यांच्या पत्नी जमुना चेंटमपल्ले यांनी आपली कन्या अनुष्का हिचा ९वा वाढदिवस १९ डिसेंबर रोजी निवारा बालगृहात साजरा करुन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.याअगोदरही शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आवश्यक साहित्याचे वाटप करुन त्यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनुष्कानेही उपस्थित मान्यवरांसमोर यापुढेही माझा वाढदिवस अशाच सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी अॅड.अरुण जाधव ,जयसिंग उगले ,सुशेन चेंटमपल्ले यांनी मनोगत व्यक्त केले.संभाजी वटाणे यांनी मनोगत व्यक्त करुन प्रत्येक वर्षी निवारा बालगृहाला पाच क्विंटल धान्य देण्याचे जाहिर केले. कार्यक्रमाचे सूञसंचलन संतोष चव्हाण यांनी तर आभार श्री.विजयकुमार रेणुके यांनी मानले.



