जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जिव्हाळा फाउंडेशन जामखेडच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्य तिथी निमित्त अभिवादन सभा जिजाऊ नगर जामखेड येथे आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन राजर्षि छत्रपती शाहू महाराज पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराटे , प्रा. मधुकर राळेभात, डॉ. सुहास सुर्यवंशी ,मौलाना खलील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी एस टी महामंडळाचे डेपो मॅनेजर महादेव शिरसाठ ,शिक्षक नेते राम निकम, प्रसिद्ध कवी आ.य. पवार,जावेद सय्यद, बजरंग पवार, नामदेव राळेभात, रंगनाथ राळेभात ,संतोष घोलप, संजय औचरे,कांग्रेसचे नेते सुनिल शिंदे, जमीर सय्यद, अमोल भोंडवे, प्रा. जाकीर शेख, हबीब खान(मास्टर), संतोष उगले, अमृत राळेभात, बाळासाहेब राऊत, अवधूत पवार, कुंडल राळेभात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये राम निकम यांनी जिव्हाळा फाऊंडेशन राबवत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची माहिती दिली तसेच गाडगेबाबांच्या जीवनचरित्रांची माहिती सांगून आज त्यांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले,ज्ञानोबा,तुकोबा व विनोबा हे जुने संत होऊन गेले परंतु गाडगेबाबा हे या सर्वांहून वेगळे संत होते,ते समाजसेवेतून व स्वच्छतेतून आपले विचार लोकांना सांगत असत, अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे काम गाडगेबाबांनी केले, स्वच्छता अभियान हे गाडगेबाबांच्या नावाने शासनाने सुरु केलेले अभियान आहे त्यामुळे आपणास स्वच्छता राखण्याचे महत्व कळते आपण आपली,आपल्या घराची व आपल्या परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे व आपल्या घरातील सर्वाना स्वच्छतेचे महत्व सांगून त्याविषयी जागरूक राहिले पाहिजे व गाड्गेबाबांचे विचार घराघरात पोहोचवले पाहिजेत असे राम निकम यांनी सांगितले,
यावेळी श्री रंगनाथ राळेभात यांनी गाडगेबाबा व स्वच्छतेवर एक कविता गाऊन दाखवली, डॉ सुहास सूर्यवंशी यांनी गाडगेबाबा हे त्या काळातील डॉक्टर होते असे सांगितले,नामदेव राळेभात यांनी गाडगेबाबा शिक्षण ,आरोग्य व समाजसुधारणा या त्रिसूत्री समाजात रुजवत होते असे सांगितले ,जाकिर शेख यांनी गाडगेबाबा प्रश्नोत्तर रुपाने समाजप्रबोधन करत असत हे सांगितले ,मधुकर आबा राळेभात यांनी जुन्या काळातील संतांच्या आचार व विचारांची समाजाला गरज असल्याचे सांगितले,
अध्यक्षीय भाषणात भानुदास बोराटे यांनी अनिष्ठ रुढीवर व अंधश्रद्धेवर प्रहार करणारे हे महान संत होते असे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडल राळेभात यांनी तर आभार जमीर सय्यद यांनी मानले




