Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या हार्दिक, रोहित यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग

हार्दिक, रोहित यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग

0
335
जामखेड न्युज – – – 
कर्जत-जामखेड : राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात म्हणजेच कर्जत-जामखेडमध्ये आज हार्दिक पटेल यांची सभा आयोजित करणात आली होती. त्या सभेला महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीतील काही मोठे नेतेही उपस्थित होते. याच सभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि रोहित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनीही आपल्या भाषणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रोहित आणि हार्दिकमुळे मला क्रिकेटचे ग्राऊंड आठवले
सभेत बोलताना रोहित आणि हार्दिक या नावांमुळे मला लगेच क्रिकेटचे ग्राउंड आठवलं असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. संकटाच्या काळात तुमच्याविरोधात इथले मंत्री होते, मात्र दुष्काळाच्या काळात तुम्ही पाणी द्यायचं काम केलं. सामाजिक न्याय विभागात सर्वात जास्त पत्रे रोहित पवारांची होती असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आम्ही स्वप्न पाहिले आमचे मतदारसंघ बारामती सारखे व्हावे, तेच स्वप्न रोहित पवारांनी पाहिले, येत्या काळात हा मतदारसंघ दिल्लीत पोहचेल. असेही मुंडे म्हणाले. तर दोन वर्षात कोविडच्या काळात देखील कोविड सेंटर उभारले, सर्व मद्दत केली. मोठ्याच पोरग जरी असले तरी आज तुम्हाला तुमच वाटतंय. रोहित दादा तुमच नाव जेव्हा ठेवलं तेव्हा त्याचा संस्कृत अर्थ तुमच्या आई वडिलांना देखील माहीत नसेलस, रोहित म्हणे सूर्याचं किरण, असा त्यांच्या नवाच्या अर्थाचा उलगडाही धनंजय मुंडेंनी करून दिला.
ओबीसी आरक्षण, ईडीवरून केंद्रावर टीका
सर्व केंद्रीय संस्था सरकारचे काम करत आहेत, ईडीचे तर चव घालवली, अशा शब्दात धजनंय मुंडेंनी केंद्रावर टीका केलीय. काही म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि ओबीसी आरक्षण गेले. त्यांनी इतिहास तपासावा व्ही. पी. सिंग यांनी आणलेला आयोग जसाचा तसा स्वीकारला. Obc ची केस चालली त्यांच्या काळात, निकाल आमच्या काळात, आम्ही दोषी कसे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
 हार्दिक पटेलांची रोहित पवारांवर स्तुतिसुमनं
रोहित पवार शरद पवारांचे नातू जरी असले, तरी त्यांनी कधीच त्यांच्या नावाचा वापर केला नाही. रोहित पवारांनी स्वतःला सिद्ध केलं. आपण पवारांचे नातू आहोत, अशा आर्विभावात ते कधीच वागले नाहीत, असं म्हणत हार्दिक पटेलांनी रोहित पवारांबाबत कौतुकोद्गार काढलेत.
दरम्यान, गुजरातला देखील कर्जत जामखेडची ओळख रोहित पवारांमुळे झाल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलंय. गुजरातमध्ये (Gujrat) आम्ही भाजपला पाणी पाजलं असून इथं देखील तेच करुन दाखवुया, असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलंय.
भाजप आणि मोदींवर हल्लाबोल
एकीकडे पवारांची तारीफ करुन झाल्यानंतर हार्दिक पटेल यांनी मोदींवर सडकून टीका केली. तसंच शरद पवार यांच्या परिवाराला दिल्लीतील लोक त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींचं गुजरात मॉडेल खोटं असून गुजरातमधील भाजपच्या अपयशाचा पाढाही हार्दिक पटेल यांनी यावेळी वाचला.
गुजरातमध्ये 50 हजार शेतकऱ्यंनी आत्महत्या केली असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलंय. 50 हजार कोटीचं ड्रग्ज आढळल्याबाबत कुणीच काही बोललं नाही, यावरुनही त्यांनी सवाल उपस्थित केलेत. मोदींनी सांगितलेलं दोन कोटी रोजगार मिळतील. खरंच जर 2 कोटी रोजगार मिळाल्याचं मला कुणी दाखवून दिलं तर मी भाजपचा पट्टा घालेन, असंही खुलं आव्हान हार्दिक पटेल यांनी दिलंय.
आपल्या भाषणाच्या शेवटी हार्दिक पटेल यांनी मराठीतून भाषण करत मतदानासाठी आवाहनही केलंय. हार्दिक पटेल हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांचं मोठ्या उत्साहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!