जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील शिऊर ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१९ ते २०२१ या या दरम्यान दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता, पाणीपुरवठ, एलइडी बल्ब यासाठी १७ लाख रूपये निधी आला होता. परंतु सदर निधी दलितवस्तीमध्ये कुठेही खर्च केलेला आढळून आलेला नाही. व त्या निधीचे बिल देखील निघालेले आहे. ही बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. यामुळे शिऊर ग्रामस्थांनी या बाबत चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी यासाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
सदर निधीचे पैसे तत्कालीन ग्रामसेवक यांनी परस्पर बोगस बिले दाखवुन हडप केले व आम्हा दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवले असून संबंधित ग्रामसेवकाने आमच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे. तरी संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे न केल्यास आम्ही समस्त शिऊर ग्रामस्थ व दलित समाज सर्व दि .१३ डिसेंबर २०२१ रोजी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले असून दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी उपोषणास बसण्याचे निवेदन देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज अखेर सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, मनिष घायतडक, पांडूरंग समुद्र, शिवाजी समुद्र, लक्ष्मण पुलावळे, सोपान रिटे, गुलाब समुद्र, काळू समुद्र, राहुल समुद्र, अनसाबाई वाल्हेकर, सुनिता रिटे, शकुंतला रिटे, पुष्पा भगवान समुद्र, सुनिता दिपक समुद्र, शिला पांडूरंग समुद्र, दिपक पुलावळे, आदी नागरिक उपोषणास बसले आहेत.