जामखेड प्रतिनिधी
कुटुंबातील मुला मुलींना चांगले शिक्षण द्या यातच खरी कुटुंबाची प्रगती आहे. येणाऱ्या अडीअडचणींचा धैर्याने सामना करा तुमच्या सुखदुःखात मी तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून सदैव बरोबर आहे असे रोहिणी काशिद यांनी हळदी कुंकू कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद मित्रमंडळाच्या वतीने रोहिणी काशिद यांनी शहरातील प्रभाग 18 मधील बेलेकर गल्ली व सुतार गल्लीतील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिनाताई बेलेकर, अलकाताई काशिद यांच्या सह शेकडो महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना रोहिणी काशिद म्हणाल्या की, घरात मुलगा मुलगी भेदभाव करू नका दोघांनाही चांगले शिक्षण द्या. तसेच तुमच्या अडीअडचणी मला एक घरातील सदस्य म्हणून सांगा त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सर्व महिलांसाठी अल्पोपाहाराचीही सोय करण्यात आली होती.