Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  247 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  247 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

0
274
जामखेड न्युज – – – 
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन  247 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स पोहोचवले जात असल्याचा डीआरआयला संशय आहे. आत्तापर्यंतची एअरपोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स पकडण्याची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. या प्रकरणात डीआरआयने झिंबाब्वेमधील दोन नागरिकांना ताब्यात घेतल आहे, ज्यामध्ये एक महिला (वय 46) आणि एक पुरुष (वय 27) यांचा समावेश आहे.
हे दोन्ही झिम्बाब्वेचे नागरिक वेगवेगळ्या फ्लाईटने निघाले होते आणि एडिस अबाबा मधून कन्साईमेंटला घेऊन फ्लाईट ने मुंबईला पोहोचले. या दोघांना अटक केल्यानंतर यांच्याकडून 35 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने एआययुला केस हॅन्ड ओव्हर केली आहे. आता या स्मगलिंग रॅकेटचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!