Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहिद अधिकार्‍यांना शिवनेरी अकॅडमीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी परेडचे आयोजन

हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहिद अधिकार्‍यांना शिवनेरी अकॅडमीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी परेडचे आयोजन

0
370
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – – – 
हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत सह त्यांची पत्नी व इतर अधिकार्‍यांचे दुर्दैवी निधन झाले. यामुळे देशावर मोठे संकट कोसळले आहे. दुर्घटनेतील मृत अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीच्या मैदानावर शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अकॅडमीचे प्रमुख कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी दिली
सर्व जामखेड मधील रहिवाशी, आजी-माजी सैनिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय व पोलीस बांधव या सर्व मान्यवरांना विनंती की उद्या दि.10 Dec 21 रोजी सकाळी ठीक 11 वा. आपल्या भारत देशाचे आकस्मित हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटनेत शाहिद झालेले तिन्ही सेनांचे समन्वयप्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व त्यांच्या धर्मपत्नी तसेच त्यांच्या सोबत शाहिद झालेले अधिकारी व सर्व जवान यांना प्रहार सैनिक कल्याण संघ, जामखेड, तसेच शिवनेरी करिअर अकॅडमी, जामखेड व सर्व आजी माजी सैनिक जामखेड या सर्वांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे, तरी सर्व सैनिक बांधव, सर्व क्षेत्रातील मानण्यावर व जामखेड तालुक्यातील सर्व रहिवाशी, सर्वांना विनंती की आपल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती
प्रहार सैनिक कल्याण संघ, जामखेड शिवनेरी करिअर अकॅडमी, जामखेड आजी माजी सैनिक जामखेड
स्थळ शिवनेरी करिअर अकॅडमी,  बीड रोड जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!