जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या कडे दाखल करण्यात आला यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, पांडुरंग सोले पाटील, प्रा. अरूण वराट सर, सुधीर राळेभात, किसनराव ढवळे, दादाहरी थोरात, अंकुशराव ढवळे, तुषार पवार, अमृत पाटील, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, फुंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि. २० रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केले होते की, मी जिल्हा बॅकेची निवडणूक लढविणार नाही तर मी पॅनल समितीमध्ये आहे. त्यामुळे आता जामखेड तालुक्यातुन भाजपाचे उमेदवार म्हणून जगन्नाथ राळेभात हे निश्चित झाले आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून राळेभात हे जामखेडचे जिल्हा बॅंकेत प्रतिनिधीत्व करत आहेत. विखे पाटील गटाचे ते एकनिष्ठ आहेत. फक्त पाच वर्षे खासदार सदाशिवराव लोखंडे हे संचालक होते.
जामखेड तालुक्यात एकुण 47 मतदार आहेत. बहुसंख्य मतदार हे राळेभात बरोबर आहेत. आता तालुक्यात दुसर्या गटातर्फे कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्त्वाचे आहे.